JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / विचित्र! सासूचं जावयावर जडलं प्रेम, लग्नाअगोदरच लेकीला धक्का

विचित्र! सासूचं जावयावर जडलं प्रेम, लग्नाअगोदरच लेकीला धक्का

होणाऱ्या जावयावरच सासूचं प्रेम जडल्यामुळे (Mother confess to be in love with son in law) तरुणीला जबर धक्का बसल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

होणाऱ्या जावयावरच सासूचं प्रेम जडल्यामुळे (Mother confess to be in love with son in law) तरुणीला जबर धक्का बसल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. वास्तविक, आपल्या मुलीचं लग्न होणं, हा कुठल्याही आईच्या आयुष्यातील एक भावनिक क्षण असतो. त्या क्षणासाठी वेगळी तयारी केली जाते आणि आपल्या लेकीचं लग्न थाटामाटात (Girl shocked to listen mother) पार पडावं यासाठी आई मेहनत घेत असते. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेत मुलीच्या लग्नाला यायलाच आईनं नकार दिला. आमंत्रण नाकारलं आपल्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी ही मुलगी तिच्या आईच्या घरी गेली होती. त्यावेळी आपण लग्नाला येऊ शकत नाही, असं तिच्या आईनं सांगितलं. हे उत्तर ऐकून तरुणीला धक्का बसला. मात्र आपली आई आपल्या लग्नाला यायला का नकार देत आहे, ते काही तिला समजेना. तिने पुन्हा पुन्हा खोदून खोदून तिला हे विचारलं. त्यावेळी अखेर आईनं आपल्या मनातील भावना तिच्यासोबत शेअर केल्या. आईनं उलगडलं गुपित आपलं आपल्या भावी जावयावर प्रेम जडलं असून त्यामुळेच आपण या लग्नाला हजर राहायला नकार देत आहोत, असं तिनं सांगितलं. हे ऐकून लेकीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिला गेल्या काही महिन्यांतील घटना आठवू लागल्या. आपल्या भावना तिने नाव शेअर न करता सोशल मीडियावरून शेअर केल्या आहेत. आपण होणाऱ्या पतीसोबत बाहेर जाताना अनेकदा आपली आई सोबत असायची. दोघे एकमेकांसोबत अनेकदा टेनिसही खेळत असत. मात्र त्यातून असं काही होईल, याची कधी कल्पनाही आली नसल्याचं तिनं शेअर केलं आहे. हे वाचा-  रणवीर-दीपिका डेहराडूनमध्ये साजरी केली मॅरेज अॅनिवर्सरी; VIDEO व्हायरल तरुणालाही धक्का आपल्या सासूनं केलेल्या या गौप्यस्फोटानंतर तरुणालाही धक्का बसला असून तिघेही त्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला सध्या तरी लग्नाला हजर राहणं योग्य वाटत नसून काही काळानंतर मनस्थिती सुधारली, तर आपण निर्णय बदलू, असं सासूनं सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या