बनासकांठा, 27 जुलै: पालनपूर डीसा महामार्गावरील बनासकांठा येथील एका ढाब्याबर काही महिलांनी (Women) आणि पुरुषांनी किरकोळ (Mob attack on hotel) कारणातून तोडफोड (Vandalism) केल्याची घटना समोर आली आहे. काल सायंकाळी सहाच्या सुमारास 10 जणांच्या जमावानं धाब्यात शिरत ही तोडफोड केली आहे. याशिवाय आरोपींनी या ढाबा चालकाला जीवे मारण्याची धमकी (Threat) देखील दिली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Viral video) होतं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालनपूर तालुका पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहेत. काल सायंकाळी पाण्याची बाटली खरेदी करण्यावरून ढाबा चालकासोबत वाद झाला होता. याच रागातून 10 जणांच्या जमावानं पालनपूर डीसा रोडवरील चौधरी ढाब्यावर सुमारे हल्ला केला आहे. आरोपींनी हातात काठ्या घेऊन ढाब्यात प्रवेश केला आणि टेबल्स आणि खुर्च्यांची तोडफोड केली आहे.
हेही वाचा- नाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा यानंतर आरोपींनी ढाबा मालकासह कर्मचाऱ्यांना धमकावत घटनास्थळावरून पळ काढला आहे. अचानक 10 जणांनी हल्ला केल्यानं ढाब्याचे मॅनेजरही घाबरून गेले होते. जमावाच्या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली. घटनेची माहिती मिळताच पालनपूर तालुका पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.