11 एप्रिल : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व आणि तासगाव-कवठेमहांकाळ पोटनिवडणुकीचे मतदान पूर्ण झालं आहे. वांद्रे पूर्वमध्ये 43 टक्के मतदानाची नोंद झाली. तर तासगावामध्ये 58 टक्के मतदान झालं. त्यामुळे आता 15 एप्रिल रोजी येणार्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.
वांद्र्यात आज दिवसभर दिग्गज नेत्यांवरील कारवाईमुळे मतदानाबरोबर पोलीस कारवाईचीही चर्चा चांगलीच गाजली. नितेश राणे, निलेश राणे, विनायक राऊत आणि वारिस पठाण यांना पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना आचारसंहितेचे नियम मोडल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान वांद्रे पूर्वमध्ये नारायण राणे विरुद्ध शिवसेना आणि एमआयएम अशी तिरंगी लढत असल्याने इथे कोण बाजी मारणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. तर तासगावात आबांच्या पत्नीविरोधात 8 अपक्ष उमेदवारांचं आव्हान असलं तरी त्यांचा सामना एकतर्फी होण्याची शक्यता आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++