लातूर, 25 जून : लातूरातील स्टेप बाय स्टेप क्लासचा संचालक अविनाश चव्हाण याची मध्यरात्रीच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. या घटनेमुळं शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. मध्यरात्री एकच्या सुमारास शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या महसूल कॉलनीजवळ अविनाश चव्हाणवर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घातल्या. त्यातली एक गोळी त्याच्या उजव्या छातीत लागण्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. अविनाश चव्हाण स्वत:च गाडी चालवत होता. या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी हजर पोहोचले. लातूर हे शैक्षणिक क्षेत्रात नावारूपाला आलंय. यामुळे येथे मोठ्याप्रमाणात खासगी क्लासेसचं मोठं प्रस्थ वाढलंय. मागील काही वर्षात अविनाश चव्हाणनचे स्टेप बाय स्टेप क्लासेस नावारूपाला आले होते. काही दिवसापूर्वी त्यांने क्लासमधील मुलांना एक कोटीचं बक्षीस दिलं होतं. शिवाय काही दिवसांपूर्वी जीमच्या उद्घाटनासाठी त्याने अभिनेत्री सनी लिओनीला लातूर आणल्यानं तो चर्चेत आला होता. क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं ! पुढील वर्षी यापेक्षा दुप्पट बक्षीस ते देणार होते. नांदेड येथे ही आजपासून ते आपली ब्रँच सुरू करणार होते. उच्च्भ्रू लोकवस्तीत ही हत्या झाली आहे. या घटनेबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात येत असले तरी अविनाश चव्हाण यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीत चार संशयितांची नावं देण्यात आलीयेत. त्यात एका क्लासेस चालकाचा देखील समावेश आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. दरम्यान, क्लाससेस मधील चढाओढीतूनच ही हत्या झाली आहे का किंवा इतर काय कारण आहे याचा पोलीस तपास करीत आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली असून पोलिसांची ५ पथकं ही यासाठी पाठविण्यात आली आहेत. आता नेमके हत्येचे काय कारण याचा शोध पोलीस घेत आहेत. कोण आहे अविनाश चव्हाण ? - अल्पावधीतच खाजगी कोचिंग क्लासेस क्षेत्रात नावारूपाला आलेलं एक नाव - खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये परराज्यातले शिक्षक आणून लातुरात क्लासेस चालवणं हा मुख्य व्यवसाय - शिक्षण क्षेत्रात कार्य असले तरी जिल्ह्यातल्या अनेक पोलीस ठाण्यात अविनाश चव्हाण यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत - क्लासेस सोबतच जिम व्यवसायात कोट्यवधींची गुंतवणूक - एडॉल्फ नावाच्या जिमच्या उदघाटनासाठी बोल्ड अभिनेत्री सनी लियोनीला पहिल्यांदा लातुरात आणलं आणि नव्यानं पुन्हा अविनाश चव्हाण हे नाव समोर आले. - क्लाससेसमधील चढाओढीतूनच ही हत्या झाली असल्याचं सध्या बोललं जातंय आणि मोटेगावकर क्लासेसचा संबंध देखील या घटनेशी जोडला जातोय - शिवाय अन्य काही राजकीय आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा या खुनात हात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय - अविनाश चव्हाण यांच्यावरील मागील गुन्ह्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा तपास देखील पोलीस करत आहेत.