भारताने कॉमनवेल्थ गेम्ससाठी (Commonwealth Games) पुरूष हॉकी संघ जाहीर केला आहे. मनप्रीत सिंहकडे कर्णधारपदाची तर हरमनप्रीत सिंहकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.
भारताने सोमवारी कॉमनवेल्थ गेम्ससाठी पुरूषांचा संघ जाहीर केला आहे. मनप्रीत सिंहकडे कर्णधारपदाची तर ड्रॅग फ्लीकर हरमनप्रीत सिंहकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.
हॉकी इंडियाने बर्मिंगहॅम तसेच 2024 पॅरिस ऑलिंपिकच्या पात्रता फेरी हांगझोऊ आशियाई खेळांसाठी कमी वेळ असल्याने कॉमनवेल्थ गेम्ससाठी दुसऱ्या श्रेणीची टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे चीनमध्ये आशियाई खेळ स्थगित करण्यात आले होते. यानंतर 28 जुलैला होणाऱ्या या स्पर्धेसाठी हॉकीचा पुरूषांचा संघ निवडला आहे. भारतीय हॉकी टीमचा पूल बी समावेश करण्यात आला आहे. यात भारतासोबत इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना हे देशही आहेत.
मागच्या वर्षी टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवल्यावर मनप्रीतने अमित रोहिदास यांची जागा घेणार असल्याचे संकेत दिले होते. अमित दास याने बेल्जियम आणि नेदरलँड विरुध्द एफआयएच हॉकी प्रो लीगच्या सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवले होते. उपकर्णधार असलेल्या हरमनप्रीतने हॉकी प्रो लीगमध्ये जास्त गोल केले होते. कॉमनवेल्थ सामन्यात भारताचा सामना घानाशी होईल.
आम्ही कॉमनवेल्थ गेम्ससाठी उत्कृष्ट टीम निवडली आहे. या खेळाडूंना एफआयएच हॉकी प्रो लीगच्या सामन्यात तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुध्द खेळण्याचा अनुभव आहे. आम्ही बेल्जियम आणि नेदरलँडच्या खेळाचा अभ्यास करणार असल्याचे मुख्य कोच ग्रॅहम रीड यांनी सांगितले.
टीममध्ये दुखापतीनंतर गोलकीपर पीआर राजेश कमबॅक करत आहे. तसेच कृष्ण बहादूर पाठकचाही समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर हॉकी टीममध्ये वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जुगराज सिंह आणि जरमनप्रीत सिंह सुध्दा आहेत. मिडफील्डमध्ये मनप्रीत, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंह, आकाशदीप सिंह आणि नीलकांत शर्मा खेळतील.
कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय पुरूष संघ पुढीलप्रमाणे गोलकीपर: पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादूर पाठक. डिफेंडर: वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जुगराज सिंह, जरमनप्रीत सिंह. मिडफील्डर: मनप्रीत सिंह (कर्णधार), हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंह, आकाशदीप सिंह आणि नीलकांत शर्मा.