JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / तुम्ही UPI-ऑनलाइन बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय का? RBIच्या या आहेत महत्त्वाच्या टिप्स 

तुम्ही UPI-ऑनलाइन बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय का? RBIच्या या आहेत महत्त्वाच्या टिप्स 

अनेक वेळा आपण आपली बँक, इन्शुरन्स कंपनी, आधार अपडेट सेंटर याबद्दलच्या माहितीसाठी Google सारख्या प्लॅटफॉर्मवरून कस्टमर केअर डिटेल्स घेतो.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : तुम्ही पण डिजिटल व्यवहार करता का? जर तुमचं उत्तर हो, असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आजच्या काळात डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या पद्धतींसोबतच फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. स्कॅमर्स नवनवीन पद्धतीने लोकांची फसवणूक करत असून एका झटक्यात लोकांच्या खात्यात ठेवलेले लाखो रुपये लंपास करत आहेत. हे टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एक बुकलेट प्रसिद्ध केलंय. यामध्ये फसवणूक करणाऱ्या लोकांच्या हायटेक ट्रिक्सची माहिती देण्यात आली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, नकळत किंवा जाणीवपूर्वक आपली खासगी माहिती इतरांशी शेअर केल्यामुळे अशा प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जेव्हाजेव्हा आपण ऑनलाइन व्यवहार करतो, तेव्हा खबरदारी घेणं आवश्यक आहे. आरबीआयने आपल्या बुकलेटमध्ये अशा काही पद्धती सांगितल्या आहेत, ज्याच्या मदतीने लोक आपली ऑनलाइन फसवणूक होण्यापासून टाळू शकतात. ऑनलाइन सेल्स प्लॅटफॉर्मद्वारे -  आजच्या काळात अनेक ऑनलाइन सेल्स प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, ज्यावर स्कॅम करणारे खरेदीदार म्हणून जातात. यापैकी बरेच लोक ते डिफेन्स किंवा इतर अशा सेवांमध्ये असल्याचं भासवतात, तसेच पोस्टिंग दुर्गम भागात असल्याचंही भासवण्याचा प्रयत्न करतात. खरेदीनंतर पेमेंट करण्याऐवजी, ते UPI वर रिक्वेस्ट मनी फीचर वापरतात आणि UPI पिन टाकून विक्रेत्याला रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्यास सांगतात. अशा बाबतीत तुम्ही सावध न राहिल्यास, तुम्ही तुमचा पिन टाकताच फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात पैसे थेट ट्रान्सफर होतात. स्क्रीन शेअरिंग अॅप किंवा रिमोट अॅक्सेसद्वारे -  अनेक स्कॅमर्स कॉलवर कोणालाही स्क्रीन शेअरिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. या अॅप्सद्वारे, त्यांना तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉपचा अॅक्सेस मिळतो आणि त्याद्वारे ते तुमच्या बँकिंगशी संबंधित सर्व गोपनीय माहिती गोळा करू शकतात आणि तुमचं बँक खातं रिकामं करू शकतात. सर्च इंजिनद्वारे -  अनेक वेळा आपण आपली बँक, इन्शुरन्स कंपनी, आधार अपडेट सेंटर याबद्दलच्या माहितीसाठी Google सारख्या प्लॅटफॉर्मवरून कस्टमर केअर डिटेल्स घेतो. फसवणूक करणारे लोक इथेही असतात. त्यामुळे बऱ्याचदा ओरिजनल कॉन्टॅक्टऐवजी त्यांचे नंबर इथे दिसतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही या नंबरवर कॉल केलात तर हा फसवणूक करणारा तुमच्याकडून तुमची खासगी माहिती घेऊन तुमचं खातं रिकामं करू शकतो. QR कोड स्कॅनरद्वारे -  अनेकदा फसवणूक करणारे लोक एसएमएस, टेक्स्टद्वारे लोकांशी संपर्क साधतात आणि त्यांच्या फोनवरील अॅपद्वारे QR म्हणजेच क्विक रिस्पॉन्स कोड स्कॅन करण्यास सांगतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ते QR कोड स्कॅन केला तर ते तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतात. हेही वाचा -  रिफंडच्या नादात पैसे गमावून बसतायत मुंबईकर, फसवणूक कशी टाळायची? ज्युस जॅकिंग -  अनेक वेळा मोबाईलच्या चार्जिंग पोर्टमुळे तुमच्या खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. कारण अनेक वेळा हे फसवणूक करणारे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग पोर्टमध्ये व्हायरस टाकतात. त्यानंतर चार्जिंगसाठी वापरलेला मोबाइल पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात येतो आणि ते ई-मेल, एसएमएस, सेव्ह केलेले पासवर्ड यांसारखी माहिती चोरतात. याद्वारे ते कोणाचंही बँक खातं रिकामं करू शकतात. अशा परिस्थितीत एक सजग आणि सतर्क नागरिक म्हणून या सर्व गोष्टींबाबत जागरूक राहणं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही जागरूक करणं हे आपलं कर्तव्य आहे. जेणेकरून हे चोरटे कोणालाही आपल्या जाळ्यात अडकवू शकणार नाहीत आणि आपल्या मेहनतीची कमाई चोरू शकणार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या