JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'मी शाकाहारी आहे, आणि माझ्या नावाने मटण शॉप?' 'तो' Video पाहून सोनूही चाट पडला

'मी शाकाहारी आहे, आणि माझ्या नावाने मटण शॉप?' 'तो' Video पाहून सोनूही चाट पडला

सोनूने स्वत:च एक व्हिडीओ शेअर केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 मे : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने कोरोना काळात नागरिकांना मोठी मदत केली. गरीबांच्या पाठिशी तो खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळे नागरिकांमध्ये त्याच्याविषयी नेहमी चर्चा सुरू असते. अशातच सोनूने एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. सोनूच्या नावाने मटण शॉप सोनू सूदने (Sonu Sood) तेलुगुमध्ये एका बातमीच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील करीमनगर येथे मटण शॉपला सोनूचं नाव देण्यात आलं आहे. ट्विटरवर या बातमीवर मजेशीर प्रतिक्रिया देत अभिनेत्याने लिहिलं आहे की, मी शाकाहारी आहे आणि माझ्या नावावर मटणाचं दुकान? काही शाकाहारी दुकान सुरू करण्यासाठी त्यांची मदत करू शकतो?

हे ही वाचा- कोरोना काळात बिग बींची मोठी खरेदी; मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घ ट्विटरवर एका चाहत्याने दिलेल्या माहितीनुसार, मटण शॉपचा मालिक ग्राहकांकडून 50 रुपये कमी आकारत आहे. हे जमा केलेले 50 रुपये सोनू सूदच्या फाऊंडेशनला दान करण्याचा निर्णय दुकानाच्या मालकाने घेतला आहे. कोविड-19 महासाथीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अभिनेता सोनू सुदने कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कंस्ट्रेटर आणि अन्य आवश्यक उपकरणांची व्यवस्था केली आहे. सोनूने नुकतीच सोशल मीडियावर घोषणा केली आहे की, जून महिन्यात तो आंध्रप्रदेशमध्ये काही ऑक्सिजन सयंत्र स्थापिक करेल. त्याने नुकतचं ट्वीट करुन याबाबत माहिती दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या