मुंबई,ता.5 जुलै : शुक्रवारपासून मुंबईसह कोकण भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथंही चांगला पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याचे वैज्ञानिक अजयकुमार यांनी दिला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर मुंबई महापालिका प्रशासनाची चिंता वाढणार आहे.