JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'या' देखण्या आयपीएस अधिकाऱ्याच्या प्रेमासाठी तरूणीने सोडलं घरदार!

'या' देखण्या आयपीएस अधिकाऱ्याच्या प्रेमासाठी तरूणीने सोडलं घरदार!

मध्यप्रदेशातल्या उज्जैनचे एसपी सचिन अतुलकर यांच्या प्रेमात पडून त्यांना भेटण्यासाठी एक तरूणी पंजाबमधून घरातून पळून उज्जैनला आलीय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उज्जैन,ता.20 जून : मध्य प्रदेशातल्या उज्जैनचे एसपी सचिन अतुलकर सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये सर्वाधिक भरणा आहे तो तरूणींचा. त्याचं कारणही तसचं आहे. हँडसम आणि पिळदार शरीरयष्टी असलेला हा तरूण आयपीएस अधिकारी कुठल्याही हिंदी चित्रपटात हिरो शोभेल असा आहे. त्यामुळं तरूणी त्यांच्यावर कायम फिदा असतात. त्यांच्यावर फिदा असलेली अशीच एक तरूणी पंजाबमधल्या होशियारपूरमधून चक्क उज्जैनमध्ये आली आणि अतुलकर यांना भेटायचच असा हट्टच तिनं धरला. अतुलकर यांच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना सुरवातीला हा प्रकार लक्षात आला नाही. मात्र नंतर तरूणीचा खरा उद्देश लक्षात आल्यानं महिला पोलिसांनी तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या कुटूंबियांनाही निरोप देवून बोलावून घेतलं. तिचे आई-वडिलही उज्जैनला पोहोचले असून तेही तिची समजूत काढत आहे. मात्र सचिन अतुलकरांना भेटण्यासाठी ती अडून बसलीय. तरूणीला भेटण्यास आपली हरकत नसून काही काम असेल तरच भेटता येईल. मात्र खासगी कारणासाठी भेटणार नाही असं अतुलकर यांनी स्पष्ट केलं. सचिन अतुलकर हे 2007 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे वडिल परराष्ट्र खात्यात अधिकारी होते. तर त्यांचा मोठा भाऊ हा सैन्यात आहे. अतुलकर यांना साजिक कार्यातही रस असून विविध कार्यक्रमांमध्ये ते भाग घेत असतात. घोडेस्वारी, पोहोणे, ट्रेकिंग, गाणे हे त्यांचे छंद आहेत. योग, व्यायाम हा त्यांच्या दैनंदिनिचा अविभाज्य भाग असून व्यायाम करणं ते कधीही टाळत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या