नवी दिल्ली,ता.27 जून: बानीरवचा भारतीय पासपोर्ट रद्द झाला असला तरी तो विदेशी पासपोर्टच्या साह्यानं भटकंती करत आहे. त्याची नाकेबंदी करण्यासाठी केंद्र सरकार खास योजना तयार करत असून नीरवच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्व यंत्रणार कामाला लागली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांना 6 आॅगस्टपर्यंत दिलासा औरंगाबादमध्ये बायको नको म्हणून पुरुषांनी वडाला मारल्या उलट्या फेऱ्या परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन नीरवला भारतात कसं आणता येईल यावर चर्चा केली. नीरव हा ब्रिटन, बेल्जियम आणि फ्रान्स या देशांमध्ये फिरतो आहे, त्यामुळं या सर्व देशांना परराष्ट्र मंत्रालयाने पत्र पाठवून नीरवचा ठावठिकाना विचारला आहे. नीरवला पकडण्यासाठी लवकरात लवकर रेड कॉर्नर नोटीस काढण्याचाही परराष्ट्रमंत्रालयाचा प्रयत्न आहे.
रेड कॉर्नर नोटीस निघाली की निरवला ट्रेस करणं सोपं जाणार असून त्याचा ठावठिकाणा देणं त्या देशांना बंधनकारक ठरणार आहे. तर दुसऱ्या योजनेनुसार नीरव कुठल्या देशात आहे त्याचा शोध घेऊन त्या देशाशी प्रत्यार्पणाबाबत चर्चा करणं या पर्यायावरही परराष्ट्रमंत्रालयात विचार करण्यात येत आहे.