JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / गव्हावर शेतकऱ्याचा नवा प्रयोग, पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी

गव्हावर शेतकऱ्याचा नवा प्रयोग, पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी

वाराणसीतून गव्हाच्या ८ ते ९ जातींचे बियाणे आणून उत्पादन घेतलं आहे. या पीकाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या गव्हाची लोंबी ९ ते ११ इंच इतकी आहे. तर गव्हाच्या पीकाची उंची ३ फुटांपर्यंत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ललितेश कुशवाहा प्रतिनिधी भरतपूर : गव्हाचे पीक हे एक रब्बी पीक आहे. गव्हात असलेलं प्रोटीनचं प्रमाण हे इतर धान्यांच्या तुलनेत सर्वाधिक असतं. त्यामुळे हे खाद्यान्न म्हणून महत्त्वाचं असून याला जगभरात मागणी असते. सध्याच्या काळात प्रत्येक शेतकरी आपल्या पिकात नवनवीन प्रयोग करण्यास उत्सुक असतो. यापैकीच एक आहेत भरतपूर जिल्ह्यातल्या पीपला गावचे दिनेश तेंगुरिया. वाराणसीतून गव्हाच्या ८ ते ९ जातींचे बियाणे आणून उत्पादन घेतलं आहे. या पीकाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या गव्हाची लोंबी ९ ते ११ इंच इतकी आहे. तर गव्हाच्या पीकाची उंची ३ फुटांपर्यंत आहे. दिनेश यांच्या शेतातल्या गव्हाचे पीक पाहण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यांतील कृषी अधिकारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतात येत आहेत. याआधी दिनेश यांनी तुर्कीतून बाजरीचे बियाणे मागवून घेतलेल्या पीकाचीही चर्चा झाली होती. गव्हाच्या पीकाबद्दल सांगताना दिनेश यांनी सांगितले की, मी तुर्कीतून बियाणे मागवून पीक घेतलं होतं. हे बियाणे खरेदी करण्याची मागणी झाली. तेव्हा एका ग्राहकाशी संपर्क साधला असता वाराणसीतल्या गव्हाबद्दल समजलं. तेव्हा मी १० हजार रुपये क्विंटल किमतीने बियाणांची खरेदी केली होती.

जवळपास ६ हेक्टर जमिनीत गव्हाची लागवड दिनेश यांनी केली. आता पीक तयार झाले असून याच्या गव्हाच्या लोंबीची लांबी ९ ते ११ इंच इतकी आहे. तर गव्हाचे पीक जवळपास ३ फुटांपर्यंत उंच आहे. सर्वसामान्यपणे हे पीक दीड ते दोन फुटांपर्यंत येतं. जिल्हा कृषी अधिकारीसुद्धा गव्हाचे हे पीक पाहण्यासाठी दिनेश यांच्या शेतात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही या पीकासाठी उत्सुकता लागून राहिली आहे. दिनेश यांनी लोकांची गर्दी होत असल्याने पीकाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे. तसंच चारही बाजूने कुंपण घातलं आहे. कमी खर्चात अधिक गव्हाचे उत्पादन मिळत असल्याचा दावा दिनेश यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या