JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / विमानातच पायलटला आला हार्टअॅटॅक, तरीही केलं सेफ लँडींग

विमानातच पायलटला आला हार्टअॅटॅक, तरीही केलं सेफ लँडींग

कोलकता, ता.26 जून : इम्फाळहून कोलकत्याला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमधल्या मुख्य पायलटला आज विमानातच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. असं असतानाही त्यानं प्रसंगावधान दाखवत विमानाचं कोलकता विमानतळावर सुरक्षित लँडींग केलं. इम्फाळहून कोलकत्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात हा प्रसंग घडला. सिल्वियो डियाज अकोस्टा हे क्युबाचे 63 वर्षांचे कॅप्टन या विमानाचे मुख्य पायलट होते. कोलकत्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाला लँडिंग करायचं होतं. ‘काँग्रेसची मानसिकता कधी सुधारणार?’ निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी प्लास्टिक बंदी - राज ठाकरे मात्र त्याच दरम्यान अकोस्टा यांनी छातित दुखत असल्याची तक्रार आपल्या सहकारी पायलट जवळ केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकता, ता.26 जून : इम्फाळहून कोलकत्याला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमधल्या मुख्य पायलटला आज विमानातच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. असं असतानाही त्यानं प्रसंगावधान दाखवत विमानाचं कोलकता विमानतळावर सुरक्षित लँडींग केलं. इम्फाळहून कोलकत्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात हा प्रसंग घडला. सिल्वियो डियाज अकोस्टा हे क्युबाचे 63 वर्षांचे कॅप्टन या विमानाचे मुख्य पायलट होते. कोलकत्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाला लँडिंग करायचं होतं. ‘काँग्रेसची मानसिकता कधी सुधारणार?’ निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी प्लास्टिक बंदी - राज ठाकरे मात्र त्याच दरम्यान अकोस्टा यांनी छातित दुखत असल्याची तक्रार आपल्या सहकारी पायलट जवळ केली. नंतर काही मीनिटांमध्येच त्यांना प्रचंड घाम आला, मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी सहकारी पायलटच्या साह्यानं विमानाचं सुरक्षित लँडींग केलं.

पु. ल. देशपांडे आता हिंदी मालिकेत, पुलंच्या भूमिकेत मराठी अभिनेता

विमान उतरवल्यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी काढला तेव्हा त्यांना हार्टअॅटॅक आल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना आयसीयुमध्ये हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सत्रजीत समंता यांनी न्यूज18 शी बोलताना सांगितलं. VIDEO : वडाळ्याच्या भूस्खलनाचा थरार! मला टार्गेट केलं जातय, विजय मल्ल्याच्या उलट्या बोंबा ज्या परिस्थितीत अकोस्टा यांनी विमान सुरक्षित उतरवलं तो एक चमत्कारच होता असंही डॉक्टर म्हणाले. अकोस्टा यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं असून काही चाचण्या झाल्यानंतरच उपचाराचा पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या