JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सुप्रिया सुळेंवर टीका भोवली, 'सत्तारांवर योग्य ती कारवाई करा', राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सुप्रिया सुळेंवर टीका भोवली, 'सत्तारांवर योग्य ती कारवाई करा', राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना अपशब्द वापरले होते.

जाहिरात

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना अपशब्द वापरले होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या विधानांमुळे चर्चेत आहे. पण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका करणारे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या सिल्लोडमध्ये होणाऱ्या जाहीर सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद आणि सिल्लोड दौऱ्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना अपशब्द वापरले होते. (भाजप आणि शिंदे गटात चाललंय काय? राऊतांचा खळबळजनक दावा) या प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तार यांच्यावर जोरदार आक्षेप घेतला होता. अखेर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंच्या बाबतीत केलेल्या विधानाची राज्यपालांनी दखल घेतली आहे. राज्यपालांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. सत्तार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असं पत्रात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महिलांकडून राज्यपालांकडे सत्तार यांची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल राज्यपालांनी घेतली. ( …तर शिंदे सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाहीत, संजय राऊतांचा दावा ) काय म्हणाले होते सत्तार? ‘महाराष्ट्रामध्ये कोणतीही खळबळ उडाली नाही. मी माझ्याा बोलण्यावर ठाम आहे. जे आम्हाला खोके घेतले म्हणून बदनाम करत आहे, ते XXXचोट आहे. ते मग कुणीही असेल. खोके घेतले अशा शब्दांत जर कुणी टीका करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. मी जे बोलतोय खरं आहे. तुम्ही एका व्यक्तीचे नाव कशाला घेता. मी सर्वांसाठी बोललो. आता सर्वांसाठी बोललो. तुम्ही एका महिलाबद्दल बोलताय, असं न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीने सांगितलं, तरीही सत्तार म्हणाले की, मी सर्वांसाठी बोललोय. अजून कुणीही बोलेल, ते ज्या भाषेत बोलले, त्याला उत्तर देईन.’ असं सत्तार म्हणाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या