JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / वन-डे नंतर टेस्ट टीमच्या कॅप्टन पदावरूनही होणार होती विराटची हकालपट्टी!

वन-डे नंतर टेस्ट टीमच्या कॅप्टन पदावरूनही होणार होती विराटची हकालपट्टी!

राट कोहली (Virat Kohli) बाबत एक मोठा खुलासा झाला आहे. बीसीसीआय (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला टेस्ट टीमच्या कॅप्टनपदावरून देखील हटवणार होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जानेवारी :  विराट कोहली (Virat Kohli) बाबत एक मोठा खुलासा झाला आहे. बीसीसीआय (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला टेस्ट टीमच्या कॅप्टनपदावरून देखील हटवणार होते. टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) टीम इंडियाचा 1-2 या फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर विराटने स्वत:हून कॅप्टन पदाचा राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराटला वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही गटात बराच वाद झाला होता. ‘इनसाईड स्पोर्ट्स’ ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर विराटला कॅप्टनसी सोडण्याबाबतची सूचना देण्यावर चर्चा झाली होती. या प्रस्तावावर एकमत नव्हते. पण, बहुतेक जणांना वेगवेगळे कॅप्टन मान्य नव्हते, आणि त्यांना नवी सुरूवात हवी होती. विराटनं कॅप्टनसी सोडली नसती तर त्याला तशी सूचना देण्यात येणार होती.’ गावसकरांनी व्यक्त केला होता अंदाज दक्षिण आफ्रिका विरुद्धच्यी टेस्ट सीरिज गमावल्यानंतर आपल्याला कॅप्टनपदावरून काढतील, असं विराटला वाटत होतं, असा अंदाज टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता.  ‘विराट कोहलीला कॅप्टन पदावरून काढून टाकण्याची भीती होती, त्यामुळे त्याने आधीच राजीनामा दिला,’ असा दावा गावसकरांनी केला होता. विराटने टी-20 टीमची कॅप्टन्सी स्वत:हून सोडली होती. विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली होती. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी न सोडण्याचा सल्ला दिला होता, पण तो ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, असं गांगुलीने सांगितलं. टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, वाचा कधी आहे भारत-पाकिस्तान मॅचचा थरार गांगुलीचा हा दावा विराट कोहलीने मात्र फेटाळून लावला. मला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची निवड करण्याच्या काही मिनिटं आधी निवड समितीने तुला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे, असं सांगितल्याचं विराट म्हणाला. त्यानंतर विराट विरुद्ध बीसीसीआय हा संघर्ष सुरू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या