JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / ENG vs PAK: इंग्लंडच्या बी टीमकडून पाकिस्तानचा पुन्हा पराभव, 47 वर्षांचा लाजिरवाणा इतिहास कायम

ENG vs PAK: इंग्लंडच्या बी टीमकडून पाकिस्तानचा पुन्हा पराभव, 47 वर्षांचा लाजिरवाणा इतिहास कायम

बाबर आझमच्या (Babar Azam) पाकिस्तान टीमची इंग्लंडमध्ये श्रीलंकेसारखी अवस्था झाली आहे. लॉर्ड्सवर रविवारी झालेल्या दुसऱ्या वन-डे मध्ये (ENG vs PAK) इंग्लंडनं पाकिस्तानचा 52 रननं पराभव केला

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 11 जुलै: बाबर आझमच्या (Babar Azam) पाकिस्तान टीमची इंग्लंडमध्ये श्रीलंकेसारखी अवस्था झाली आहे. लॉर्ड्सवर रविवारी झालेल्या दुसऱ्या वन-डे मध्ये (ENG vs PAK) इंग्लंडनं पाकिस्तानचा 52 रननं पराभव केला. इंग्लंडच्या बी टीमकडून झालेला पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. इंग्लंडनं लॉर्ड्स वन-डेमधील विजयासह 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसाच्या अडथळ्यामुळे दुसरी वन-डे 47 ओव्हर्सची निर्धारित करण्यात आली होती. इंग्लंडची टीमनं पहिल्यांदा बॅटींग करताना 45.2 ओव्हर्समध्ये 247 रन काढले. इंग्लंडकडून फिल साल्ट (60) आणि जेम्स विन्स (56) यांनी अर्धशतक झळकावले. पाकिस्तानकडून हसन अलीनं भेदक बॉलिंग करत 5 विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या नवोदीत बॉलिंग अटॅकपुढे पाकिस्तान 248 रनचे आव्हान पार करेल असा अंदाज होता. त्यांच्या बॅट्समननं निराशा केली. वन-डे क्रिकेटमध्ये सध्या नंबर 1 वर असलेल्या बाबर आझमला पुन्हा एकदा मोठा स्कोअर करण्यात अपयश आले. तो 19 रन काढून आऊट झाला. पाकिस्तानची टीम पुन्हा एकदा 200 रनचा टप्पा पार करण्यात अपयशी झाले. इंग्लंडने त्यांना 41 ओव्हरमध्ये 195 रनवरच ऑल आऊट केले. इंग्लंडकडून लोअर ऑर्डरमध्ये बॅटींग करत 40 रनचे मोलाचे योगदान देणाऱ्या ग्रेगरीनं 3 विकेट्स घेतल्या. साकिब महमूद, पार्किसन आणि क्रेग ओवरटन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. WI vs AUS: ब्राव्होनं एका हातानं लगावला कडक सिक्स, पाहा VIDEO 47 वर्षांचा इतिहास कायम पाकिस्तानच्या टीमला इंग्लंडमधील वन-डे मालिकांमधील पराभवाची मालिका तोडण्यात पुन्हा एकदा अपयश आले. पाकिस्तानने इंग्लंडमध्ये 1974 साली शेवटची वन-डे मालिका जिंकली होती. त्यानंतर त्यांना एकही वन-डे मालिका जिंकता आलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या मागच्या 20 वन-डेमध्ये पाकिस्तानचा 18 वेळा पराभव झाला आहे. दोन देशांमध्ये यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या वन-डे मालिकेत पाकिस्तानचा 0-4 ने पराभव झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या