JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / वर्षभर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा आहे? मग बाथरुममधून या गोष्टी ताबडतोब काढा

वर्षभर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा आहे? मग बाथरुममधून या गोष्टी ताबडतोब काढा

बाथरूममध्ये रिकाम्या बादल्या ठेवण्याची सवयही वास्तुशास्त्रानुसार चुकीची आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

थोड्याच दिवसात नवीन वर्षाचं आगमन होतंय. सरत्या वर्षातल्या चुका नव्या वर्षात दुरुस्त करण्याची संधी या निमित्ताने मिळेल. नवीन वर्षात भाग्य उजळण्यासाठी घरातल्या काही गोष्टींमध्ये बदल करणं उपयुक्त ठरू शकतं. वास्तुशास्त्रानुसार घरातल्या बाथरूममधल्या विशिष्ट गोष्टी अशुभ फल देणाऱ्या असतात. त्या बदलून भाग्य उजळवणं या टिप्समुळे शक्य होऊ शकतं. ते जाणून घेऊ या. ‘झी न्यूज हिंदी’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. घर किंवा कोणत्याही वास्तूतल्या चांगल्या-वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. वास्तुतली स्पंदनं असोत किंवा फर्निचर, त्याचे काही ना काही परिणाम तिथे राहणाऱ्यांवर होत असतात. म्हणूनच वास्तूमध्ये चांगली स्पंदनं निर्माण करण्यासाठी वास्तुशास्त्रात उपाय सांगितले जातात. बाथरूम हा घरातला एक कमी महत्त्वाचा भाग असतो. तसंच हा भाग दर्शनी नसल्यामुळे बऱ्याचदा त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही; मात्र स्वच्छतेच्या सवयींमध्ये सर्वांत जास्त गरज बाथरूमचीच लागते. त्यामुळे तेही स्वच्छ ठेवणं जरूरीचं असतं. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये बदलही केले पाहिजेत. काही घरांमध्ये बाथरूममध्येच कपडे वाळत घातले जातात. विशेषतः छोट्या छोट्या घरांमध्ये कपडे वाळत घालण्यासाठी जागा नसते. त्यामुळे ओले कपडे बाथरूममध्येच वाळत घालावे लागतात; मात्र वास्तुशास्त्राच्या दृष्टीने असं करणं धोक्याचं ठरू शकतं. ओले कपडे नकारात्मक ऊर्जा पसरवतात. तसंच असे कपडे बाथरूममध्ये ठेवल्यानं सूर्य दोष लागतो असं मानलं जातं. स्वच्छतेच्या दृष्टीनेही कपडे मोकळ्या हवेत व सूर्यप्रकाशात वाळवणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. काही घरांच्या बाथरूममध्ये सतत नळ गळत असतो. एखाद्या नळातून किंवा पाइपमधून पाणी गळत असतं. वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट चुकीची असते. नळातून गळणारं पाणी नकारात्मक ऊर्जा पसरवतं. पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे जसं पाणी वाया जातं, तसा तुमचा पैसाही पाण्यासारखा वाया जातो, असं म्हणतात. त्यामुळे गळका नळ लगेचच दुरुस्त करून घ्यावा. बाथरूममध्ये रिकाम्या बादल्या ठेवण्याची सवयही वास्तुशास्त्रानुसार चुकीची आहे. अशा रिकाम्या बादल्या घरातल्या दुर्भाग्याला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे बाथरूममध्ये बादली किंवा टब ठेवायचा असेल, तर तो भरून ठेवावा. हेही वाचा -  या राशींसाठी 2023 ची सुरुवात होणार धमाकेदार! पदोन्नतीसह धनलाभ मिळण्याचा योग वास्तुशास्त्रात योग्य दिशा व योग्य ठिकाण याला महत्त्व असतं. त्याचप्रमाणे खराब, तुटलेल्या, फाटलेल्या वस्तू घरात असू नयेत, असं वास्तुशास्त्र सांगतं. बाथरूममध्ये तुटलेला आरसा किंवा काच असेल, तर नवीन वर्षाच्या आगमनाआधी तो काढून टाका. फुटलेल्या आरशामुळे वास्तुदोष लागतो. यामुळे पैशांच्या तंगीची समस्या उद्भवते. खराब झालेल्या वस्तू घरात नकारात्मकता पसरवतात. त्यामुळे वेळीच त्या घरातून बाहेर काढाव्यात. घरातल्या व्यक्तींच्या सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी वास्तुशास्त्र मदत करतं. दिशा, घरातलं सामान, घरातल्या व्यक्तींच्या सवयी व इतर अनेक गोष्टींवर वास्तुशास्त्र अवलंबून असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या