JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / टीव्ही अभिनेत्रीने डोक्यात हातोडी घालून Ex Boyfriend ला संपवलं, धक्कादायक कारण समोर

टीव्ही अभिनेत्रीने डोक्यात हातोडी घालून Ex Boyfriend ला संपवलं, धक्कादायक कारण समोर

या आरोपी अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या घरी एक्स बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात दांडा आणि हातोडा घातला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 31 डिसेंबर : एका 42 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला इतकी मारहाण केली की तिचा यात मृत्यू झाला आहे. या आरोपी अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या घरी एक्स बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात दांडा आणि हातोडा घातला. ही हृदयद्रावक घटना चेन्नईची आहे. ही घटना घडवून आणणारी टीव्ही अभिनेत्री एस. देवीने पोलिसांकडे जाऊन आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच या गुन्ह्यामध्ये देवीसोबत तिचा पती बी.व्ही. शंकरलाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पोलिसांनी माहिती दिली की एस. देवीने हे पाऊल उचलले कारण तिचा एक्स बॉयफ्रेंड तिच्याबरोबर पुन्हा संबंध सुरू करण्याचा आग्रह धरत होता. पोलिसांच्या तपासणीनंतर एस देवी हिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी एस. देवी तसेच तिचा नवरा बी. शंकर, देवीची बहीण एस. लक्ष्मी आणि एस. लक्ष्मी यांचे पती सावरियार यांना अटक केली आहे. या सर्वांना एम रविच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एम. रवि हा 38 वर्षांचा चित्रपटात टेक्‍नीशन म्हणून काम करायचा. कोर्टाने या सर्वांना तुरूंगात पाठविले आहे. इतर बातम्या - ‘महाविकास आघाडीचे सरकार कर्माने कोसळेल, 100% महायुतीचं सरकार पुन्हा येईल’ पोलिसांनी या प्रकरणाविषयी सांगितले की, मदुराई येथील रहिवासी रविचे 8 वर्षांपूर्वी टीव्ही मालिकांमधील किरकोळ भूमिका असलेल्या देवीशी लग्न झाले होते. सुमारे 2 वर्षांपूर्वी देवीच्या नवऱ्याला या विवाहबाह्य संबंधाबद्दल माहिती मिळाली. यानंतर कुटुंबीयांनी आणि नवऱ्याने देवीला रविपासून दूर राहण्यासाठी सांगितलं. कुटुंबाने देवीला शिवणकामाची मशीन विकत घेतली आणि देवीने अभिनयाबरोबरच टेलरिंगचे कामही सुरू केले. देवीचे पती फर्निचरचे दुकान चालवतात. रविला रहावलं नाही म्हणून त्यांने देवीचा शोध सुरू केला आणि तिच्याबद्दल माहिती मिळवली. रविवारी रवि देवीची बहीण लक्ष्मीच्या घरी पोहोचला आणि लक्ष्मीला पुन्हा एकत्र येण्याचा आग्रह धरला. लक्ष्मीने देवीला बोलावले, त्यानंतर देवी आणि तिचा नवरा तिथे पोहोचले. देवीला पाहून रविने आपली मागणी केली, ज्यामुळे भांडण सुरू झाले. रागाच्या भरात देवीने काठी आणि हातोडीने रविचे डोके फोडले. यानंतर स्वत: देवीने राजामंगलम पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. इतर बातम्या - कृष्णा श्रॉफनं शेअर केले बॉयफ्रेंडसोबत BOLD PHOTO, भाऊ टायगरनं केली ‘ही’ कमेंट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या