बीड
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 28 जुलै : राज्यात मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे. त्याच वेळी अनेक ठिकाणी धबधबे वाहात असल्याने निसर्गा सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत आहे. धबधब्यांवर आनंद लुटण्यासाठी जात आहे. मात्र तिथे काही जीवघेणे स्टंट देखील करत आहे. ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. बीड तालुक्यातील कपिलधार येथील प्रसिद्ध धबधबा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. यातच काही तरुण जीव धोक्यात घालून डोंगराच्या टोकावर धारे जवळ जाऊन काही तरुण जीव घेणे सेल्फी आणि स्टंट करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त करावा. धबधब्याच्या जवळ जाण्यास बंदी करावी अशी मागणी केली जात आहे.
बऱ्याचवेळा धबधब्यांवर किंवा सेल्फीच्या नादात दुर्घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. मात्र तरीदेखील तरुणांची हुल्लडबाजी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे या तरुणांप्रती संतापाची भावना तिथल्या लोकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला होता.विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पाऊस हजेरी लावेल. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात मात्र पुढील 3-4 दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावेल