JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सचिन तेंडुलकर आणि सीएनआर राव यांचा 'भारतरत्न'ने गौरव

सचिन तेंडुलकर आणि सीएनआर राव यांचा 'भारतरत्न'ने गौरव

04 फेब्रुवारी : क्रिकेट ज्यांचा धर्म सचिन त्यांचा देव…आज (मंगळवारी)आपला सचिन भारतरत्न झालाय. गेली दोन वर्ष क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवण्यार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर रसायनशास्त्रातील महान शास्त्रज्ञ सीएनआर राव यांनाही भारतरत्न देऊन सन्मान करण्यात आला. अख्ख्या देशासाठी हा अभिमानाचा क्षण होता. इतकी वर्ष क्रिकेटच्या मैदानावर झेंडे रोवणारा आपला लाडका सचिन आज राष्ट्रपतींकडून जेव्हा भारतरत्न घेत होता, तेव्हा अनेकांच्या चेहर्‍यावर निस्सीम आनंद होता तर काहींचे डोळे पाणावले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

1322_big 04 फेब्रुवारी : क्रिकेट ज्यांचा धर्म सचिन त्यांचा देव…आज (मंगळवारी)आपला सचिन भारतरत्न झालाय. गेली दोन वर्ष क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवण्यार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर रसायनशास्त्रातील महान शास्त्रज्ञ सीएनआर राव यांनाही भारतरत्न देऊन सन्मान करण्यात आला.

अख्ख्या देशासाठी हा अभिमानाचा क्षण होता. इतकी वर्ष क्रिकेटच्या मैदानावर झेंडे रोवणारा आपला लाडका सचिन आज राष्ट्रपतींकडून जेव्हा भारतरत्न घेत होता, तेव्हा अनेकांच्या चेहर्‍यावर निस्सीम आनंद होता तर काहींचे डोळे पाणावले. दुपारी बरोबर 12 वाजता हा सोहळा सुरू झाला.

या सोहळ्यासाठी सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सीएनआर राव यांच्या पत्नी इंदुमती राव हजर होत्या. उपराष्ट्रपती हमीद अंसारी, पंतप्रधान मनमोहन सिंग, संरक्षणमंत्री ए.के.ऍटनी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या सोहळ्याला हजर होते.आपला सचिन भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणारा पहिलाच खेळाडू ठरला. अवघ्या 16व्या वर्षी भारतीय टीममध्ये प्रवेश केल्या सचिनने गेल्याच वर्षी 18 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्याने क्रिकेटमध्ये दिलेल्या 24 वर्षांच्या योगदानाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.

संबंधित बातम्या

सीएनआर राव यांचा गौरव भारतरत्न चिंतामणी नागेश रामचंद्र राव म्हणजेच सीएनआर राव या नावानचं या जगविख्यात रसायनशास्त्रज्ञाला ओळखलं जातात. 79 वर्षांच्या राव यांनी त्यांच्या पाच दशकांच्या कार्यकाळात तब्बल 45 पुस्तकं आणि 1500 रिसर्च पेपर्स लिहिलेले आहेत. कानपूर आयआयटी आणि बंगरुळू मधल्या भारतीय विज्ञान संस्थेत त्यांनी प्राध्यापकाचं काम केलय. केंद्रसराकनं यापूर्वी त्यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवलेलं आहे. सोबत वेगवेगळ्या संस्थामध्ये त्यांनी मानाची पदं भूषवली आहेत. भारतामध्ये नॅनोटेक्नॉलॉजी आणण्यात राव यांची महत्त्वाची भूमिका होती. जगभरातल्या मानाच्या तब्बल 40 युनिव्हर्सिटीजनी राव यांना मानद डॉक्टरेट प्रदान केलेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या