JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / संजूबाबाच्या सुट्टीला नियमांनुसारच 'मान्यता'

संजूबाबाच्या सुट्टीला नियमांनुसारच 'मान्यता'

07 डिसेंबर : अभिनेता संजय दत्तची पॅरोलची रजा ही कारागृह नियमांनुसार मंजूर केलेली आहे, पोलीस आणि जेल सुप्रीटेंडंट यांच्या रिपोर्टनंतर ही रजा मंजूर कऱण्यात आलेली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिलीय. संजय दत्तची पत्नी मान्यता हिला लिव्हर ट्युमर असून तिच्यावर गरज पडल्यास उपचार करावे लागणार आहेत आणि त्यावेळी पतीची उपस्थिती आवश्यक आहे अशी माहिती मान्यताचे डॉ.अजय चौघुले यांनी खार पोलिसांकडे दिली. चौघले यांच्या माहितीवरुन खार पोलिसांनी हा रिपोर्ट दिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sanjay dutt and manyata 07 डिसेंबर : अभिनेता संजय दत्तची पॅरोलची रजा ही कारागृह नियमांनुसार मंजूर केलेली आहे, पोलीस आणि जेल सुप्रीटेंडंट यांच्या रिपोर्टनंतर ही रजा मंजूर कऱण्यात आलेली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिलीय. संजय दत्तची पत्नी मान्यता हिला लिव्हर ट्युमर असून तिच्यावर गरज पडल्यास उपचार करावे लागणार आहेत आणि त्यावेळी पतीची उपस्थिती आवश्यक आहे अशी माहिती मान्यताचे डॉ.अजय चौघुले यांनी खार पोलिसांकडे दिली.

चौघले यांच्या माहितीवरुन खार पोलिसांनी हा रिपोर्ट दिला. जेल सुप्रीटेंडंनी त्याची कारागृहातली वागणूक चांगली आहे असं सांगितलं आणि संजय दत्तचा मेव्हणा कुमार गौरव जामीन राहणार आहे. जेल प्रशासन आणि खार पोलीस याचा रिपोर्ट आल्यानंतरच ही रजा मजूर कऱण्यात आल्याचं प्रभाकर देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान, संजय दत्तच्या रजेवरुन मोठा वाद रंगला. संजयची पत्नी मान्यता हिची तब्येत बरी नसल्याच्या कारणावरून त्यानं रजेसाठी अर्ज केला होता. तो मंजूरही करण्यात आलाय. मात्र संजयची पत्नी मान्यता आजारी आहे असं सांगितलं जात असलं तरी नुकत्याच झालेल्या एका फिल्म प्रिमिअरमध्ये ती हजर होती. तसंच संजय गेल्या ऑक्टोबरमध्येही त्याला स्वतःची तब्येत बरी नसल्याच्या कारणामुळे 14 दिवसांची फर्लो रजा मिळाली होती. जी नंतर पुन्हा 14 दिवसांनी वाढवण्यातही आली होती. केवळ महिन्याभरात संजयला दुसर्‍यांदा रजा मंजूर करण्यात आलीय.

संबंधित बातम्या

त्यामुळे संजयच्या सुट्टीवर चौही बाजूने टीका होत आहे. आज सकाळी संजय दत्तला पॅरोल मंजूर केल्याचा निषेध करत आरपीआयच्या पुण्यात येरवडा जेलच्या बाहेर कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. संजय दत्त रजेवर बाहेर येत असताना त्याला काळे झेंडेही दाखवण्यात आली. दरम्यान, संजयच्या रजेची योग्य माहिती घेऊन निवेदन देणार असं स्पष्टीकरण गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या