JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / संजय काकडेंची पुन्हा 'सातवीची परीक्षा' !

संजय काकडेंची पुन्हा 'सातवीची परीक्षा' !

24 जानेवारी : राज्यसभेच्या राज्यातल्या सात जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरली आहे. पण राज्यसभेच्या सातव्या जागेसाठीच खरी चुरस आहे. या सातव्या जागेवर डोळा ठेवून पुण्यातले बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी गुरुवारी अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी अर्ज भरला. राज्यसभेची सातवी जागा पटकावण्यासाठी संजय काकडे पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरलेत. 485 कोटी रुपयांची संपत्ती प्रतिज्ञापत्रात दाखवणारे संजय काकडे यांचा वावर कायम राजकीय वर्तुळात राहिलाय. शिवसेनेच्या दोन जागा निवृत्त होत आहेत. पण, अपुर्‍या संख्याबळामुळे शिवसेनेची दुसरी जागा निघत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sanjay kakde 24 जानेवारी : राज्यसभेच्या राज्यातल्या सात जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरली आहे. पण राज्यसभेच्या सातव्या जागेसाठीच खरी चुरस आहे. या सातव्या जागेवर डोळा ठेवून पुण्यातले बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी गुरुवारी अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी अर्ज भरला. राज्यसभेची सातवी जागा पटकावण्यासाठी संजय काकडे पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरलेत. 485 कोटी रुपयांची संपत्ती प्रतिज्ञापत्रात दाखवणारे संजय काकडे यांचा वावर कायम राजकीय वर्तुळात राहिलाय.

शिवसेनेच्या दोन जागा निवृत्त होत आहेत. पण, अपुर्‍या संख्याबळामुळे शिवसेनेची दुसरी जागा निघत नाही. त्यामुळे सातव्या जागेसाठी अपक्ष आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधून जो मतांची बेगमी करेल, तो उमेदवार निवडणूक येणार आहे.

राज्यसभेच्या खासदारकीसाठी संजय काकडे यांनी गेल्या 3 वर्षांपासून तयारी चालवलीय. त्यामुळेच आपल्याला 18 अपक्ष आमदारांचा आणि इतर छोट्यामोठ्या पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा काकडे करत आहे. अपक्षांबरोबरच सेना-भाजपची मतं मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. कोण आहेत संजय काकडे ?

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या