JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / संजयला कोणत्या आधारावर रजा दिली?, केंद्राची विचारणा

संजयला कोणत्या आधारावर रजा दिली?, केंद्राची विचारणा

24 फेब्रुवारी : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्तला कोणत्या आधारावर वारंवार पॅरोल दिला जातो अशी विचारणा केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्य सरकारकडे केलीय केलीय. केंद्रीय गृहमंत्र्यालयाने राज्य सरकारला याबाबत नोटीस बजावली आहे. संजय दत्तला 18 फेब्रुवारी रोजी आणखी 30 दिवसांची सुट्टी देण्यात आलीय. संजय दत्तच्या सुट्टीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे संजय दत्त सध्या जेलबाहेर आहे. त्याने तिसर्‍यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता, आणि त्याचा हा अर्ज मान्य करण्यात आला असून संजय दत्तला आणखी 30 दिवसांची वाढीव सुट्टी मंजूर करण्यात आलीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

  sanjay dutt 24 फेब्रुवारी : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्तला कोणत्या आधारावर वारंवार पॅरोल दिला जातो अशी विचारणा केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्य सरकारकडे केलीय केलीय. केंद्रीय गृहमंत्र्यालयाने राज्य सरकारला याबाबत नोटीस बजावली आहे.

संजय दत्तला 18 फेब्रुवारी रोजी आणखी 30 दिवसांची सुट्टी देण्यात आलीय. संजय दत्तच्या सुट्टीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे संजय दत्त सध्या जेलबाहेर आहे. त्याने तिसर्‍यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता, आणि त्याचा हा अर्ज मान्य करण्यात आला असून संजय दत्तला आणखी 30 दिवसांची वाढीव सुट्टी मंजूर करण्यात आलीय. त्यामुळे 21 मार्चपर्यंत संजय दत्त जेलबाहेरचं असणार आहे.

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यापैकी अठरा महिन्याची शिक्षा संजयने अगोदर भोगली आहे. उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी संजयची रवानगी पुण्यातील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आलीय पण या शिक्षेत संजय दत्त 8 महिन्यांच्या तुरुंगवासात 4 महिन्यांच्या सुट्टीवरचं आहे. संजयला वारंवार सुट्टी देण्यात आल्यामुळे विरोध होतोय. राज्यभरात जवळपास 800 कैद्दी अजूनही रजेच्या प्रतिक्षेत आहे. पण संजयला वारंवार रजा देण्यात आहे.  संजय दत्तने आतापर्यंत किती सुट्‌ट्या घेतल्यात ?

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या