15 एप्रिल : आम्ही कोणाचही वाईट चिंतीत नाही, पण एखादा व्यक्ती आमच्या अंगावर आला तर त्याला जुमानत नाही, शिवसैनिक वाघ आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. आर्शिवाद देणारे हात आणि मन दुखावल्यावर काय होते हे आजच्या निकालावरुन स्पष्ट होतं असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
मातोश्रीच्या अंगणात पार पडलेल्या वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा दारूण पराभव केला आहे. वांद्र्यात शिवसेनेचा झेंडा फडकवल्यानंतर तृप्ती सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आजच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेतला.
पराभव कोणाचा झाला याला किंमत देत नाही. आमचा विजय हा महत्त्वाचा असतो असं त्यांनी सांगितलं. वांद्र्यातील विजयाचे श्रेय हे शिवसैनिकांचेच असून बाळा सावंत यांनी दिलेली आश्वासनं तृप्ती सावंत पूर्ण करतील अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली. मुस्लीम समाजानेही शिवसेनेला मतदान केलं असून आम्ही मुस्लीमांचा मताधिकार काढू नका असं म्हटलेच नव्हते. मुस्लीम मतांचे होणारे राजकारण थांबवलं पाहिजे असं आमचं मत असल्याचं स्पष्टिकरणही त्यांनी यावेळी दिलं.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++