JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / ओमराजेंचा पत्ता कट, उस्मानाबादेतून रवी गायकवाड रिंगणात

ओमराजेंचा पत्ता कट, उस्मानाबादेतून रवी गायकवाड रिंगणात

07 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनंआणखी दोन शिलेदारांना उमेदवारी जाहीर केलीय. उस्मानाबादमधून सध्याचे आमदार ओमराजे निंबाळकर यांचा पत्ता कट करत पुन्हा एकदा रवी गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. तर नाशिकमधून मनसेतून सेनेत दाखल झालेले हेमंत गोडसेंना रिंगणात उतरवलंय. शिवसेना भिवंडीच्या जागेच्या बदल्यात उस्मानाबादची जागा भाजपसाठी सोडणार असल्याची चर्चा होती. यासाठी शिवसेनेनं चाचपणीही केली. पण भाजपने भिवंडीची जागा सोडण्यास नकार दिली. कल्याण आणि ठाण्यात दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहे. त्यामुळे भिवंडीची जागा सेनेला दिली तर कल्याण ते ठाणे पट्‌ट्यातून भाजप बाहेर पडली असती अशी भीती भाजपला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

26626262ravi gaikwad and hemant godse 07 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनंआणखी दोन शिलेदारांना उमेदवारी जाहीर केलीय. उस्मानाबादमधून सध्याचे आमदार ओमराजे निंबाळकर यांचा पत्ता कट करत पुन्हा एकदा रवी गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. तर नाशिकमधून मनसेतून सेनेत दाखल झालेले हेमंत गोडसेंना रिंगणात उतरवलंय.

शिवसेना भिवंडीच्या जागेच्या बदल्यात उस्मानाबादची जागा भाजपसाठी सोडणार असल्याची चर्चा होती. यासाठी शिवसेनेनं चाचपणीही केली. पण भाजपने भिवंडीची जागा सोडण्यास नकार दिली. कल्याण आणि ठाण्यात दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहे. त्यामुळे भिवंडीची जागा सेनेला दिली तर कल्याण ते ठाणे पट्‌ट्यातून भाजप बाहेर पडली असती अशी भीती भाजपला होता. त्यामुळे भाजपने भिवंडीची जागा आपल्याकडे ठेवली. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी गुरूवारी रात्री मातोश्रीवर जाऊन उद्धव यांना भाजपचा निर्णय कळवलाय.

यानंतर सेनेनं उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात रवी गायकवाड यांना उतरवले आहे. विशेष म्हणजे रवी गायकवाड गेल्या लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात थोड्या मतांनी पराभूत झाले होते. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात सेनेनं हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिलीय. मागच्या निवडणुकीत हेमंत गोडसे मनसेकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. पण राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्या विरोधात अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले होते. सहा महिन्यांपुर्वी मनसेच्या एकाधिकारशाही विरोधात बंड करत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. आता शिवसेनेकडून गोडसे पुन्हा नशीब आजमावून पाहत आहे.

संबंधित बातम्या

सेनेची यादी अशी :

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या