22 जुलै : दुष्काळाचं सावट असलेल्या आणि पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातील दोन भाग वगळता रविवारी रात्रीपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे. सर्वाधिक पाऊस आर्वी तालुक्यात 332 मिमी तर सर्वात कमी पाऊस सेलू तालुक्यात 155 मिमी इतका झाला आहे. पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरले आहेत. मात्र उशिरा का होईना पाऊस आला यामुळे नागरिक सुखावलेत.
गडचिरोली जिल्ह्यात शनिवारपासून पडणार्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला तर 100 गावं संपर्कहीन झाली आहे. सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या तालुक्यांमध्ये पडला आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावर 2 फुटांपेक्षा जास्त पाणी वाहत आहे. या पावसामुळे शेतकर्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 602 मिमी पाऊस झालाय.
दरम्यान, विदर्भात मान्सून सक्रिय झाल्यामुळे पेरण्यांना जोर आला आहे. गेल्या आठवडाभरापासून विदर्भात पाऊस होत असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. दुसर्यांदा केलेल्या पेरणीला या पावसामुळे फायदा झाला आहे. कापूस, तूर आणि धानाच्या शेतीसाठी या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++