JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / राहुलनं नाही तर प्रणवदांनी सरकारला वाचवलं -अडवाणी

राहुलनं नाही तर प्रणवदांनी सरकारला वाचवलं -अडवाणी

04 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या नव्या ब्लॉगमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर वटहुकुमाच्या मुद्यावरून टीका केलीय. सरकारनं हा निर्णय मागे घेण्यासाठी राहुल यांनी वटहुकुमावर केलेली टीका नाही तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भूमिका निर्णायक ठरली असा दावा लालकृष्ण अडवाणी यांनी केला. राहुल यांनी या वटहुकुमाला केवळ नॉन्सेन्स म्हणून टीका केली होती, तो का चूक आहे याचं कोणतही कारण दिलं नव्हतं. मग नेमकं कोणत्या मुद्यावर कॅबिनेट वटहुकुमाबद्दल चर्चा करणार होतं असा सवाल अडवाणींनी विचारलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

advani vs rahul 04 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या नव्या ब्लॉगमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर वटहुकुमाच्या मुद्यावरून टीका केलीय. सरकारनं हा निर्णय मागे घेण्यासाठी राहुल यांनी वटहुकुमावर केलेली टीका नाही तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भूमिका निर्णायक ठरली असा दावा लालकृष्ण अडवाणी यांनी केला. राहुल यांनी या वटहुकुमाला केवळ नॉन्सेन्स म्हणून टीका केली होती, तो का चूक आहे याचं कोणतही कारण दिलं नव्हतं. मग नेमकं कोणत्या मुद्यावर कॅबिनेट वटहुकुमाबद्दल चर्चा करणार होतं असा सवाल अडवाणींनी विचारलाय. वटहुकुमाबद्दल भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना भेटून वटहुकूम घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचं मत मांडलं होतं असंही अडवाणींनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. अडवाणींनी आपल्या ब्लॉगमध्ये नेमकं काय म्हटलंय? “राहुल गांधी यांनी वटहुकुमावर टीका करताना आपल्या साडेतीन मिनिटांच्या भाषणात वटहुकूम पूर्णपणे नॉन्सेन्स असल्याचं आणि तो फाडून फेकून द्यावा असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांनी तो वटहुकूम चुकीचा का आहे याबद्दल कोणताही युक्तिवाद केला नव्हता. राहुल यांच्या उद्वेगात असं काय होतं ज्याबद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा होणार होती? याच्या अगदी उलट, 26 सप्टेंबरच्या संध्याकाळी मी सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यासोबत राष्ट्रपती भवनात गेलो. आम्ही राष्ट्रपतींना चार पानी निवेदन दिलं आणि वटहुकूम कशाप्रकारे केवळ घटनाबाह्य आणि बेकायदेशीर नाही तर अनैतिक असल्याची भूमिका मांडली. राष्ट्रपतींशी सुमारे पाऊण तास झालेल्या चर्चेनंतर आम्ही नोंदवलेले आक्षेप योग्य असल्याचं राष्ट्रपतींना वाटल्याचं आमच्या लक्षात आलं. आमच्या भेटीनंतर राष्ट्रपतींनी सुशीलकुमार शिंदे, कपिल सिब्बल आणि कमलनाथ या केंद्रीय मंत्र्यांना राष्ट्रपती भवनात बोलावून घेतलं. राष्ट्रपतींनी वटहुकूम पुनर्विचारांसाठी पाठवला असता तर मोठी नामुष्की ओढावेल याची जाणीव तर सरकारला झाल्यावर चक्र वेगाने फिरू लागली होती. ही नामुष्कीची परिस्थिती टाळण्यासाठी सोनियाजींनी राहुलला पुढे केलं असावं. मात्र हे सगळं कसं करावं हे कोणीही त्यांना सांगितलं नसावं. राहुल यांच्या या विजयानं केवळ पंतप्रधानांच्या नाही तर पूर्ण यूपीएच्याच अधिकार क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. वटहुकूम मागे घेण्यामुळे संपूर्ण देशाचा जो विजय झालाय तो राष्ट्रपतींमुळेच झालाय.” -लालकृष्ण अडवाणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या