28 सप्टेंबर : सुदृढ आणि निकोप लोकशाहीसाठी ‘राईट टू रिजेक्ट’ बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय योग्य असल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मांडलंय. गुन्ह्यात शिक्षा झालेल्या खासदारांची खासदारकी राहावी यासाठी सरकारने काढलेल्या वटहुकुमावर मात्र अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. सरकारच्या विरोधात राहुल गांधीनी घेतलेल्या भूमिकेवर अण्णांनी प्रश्नचिन्ह उभं करत ते जनतेची दिशाभूल करतायत असंही ते म्हणाले. तसंच व्ही.के.सिंग यांच्यावर होत असलेल्या कारवाई बाबत अण्णांनी नापसंती दर्शवली असून त्यांच्या विरोधात पुरावे असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई करावी.