21 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेसाठी पहिल्यांदाच मुंबईकरांनी भरभरून मतदान केलं. मतदानाचा टक्का 55 टक्क्यावर पोहोचल्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्का बसेल का ? अशी चर्चा रंगली होती. पण, मुंबईकर मतदार हा टक्क्याने जरी वाढला असला तरी आपला निर्णय घेण्यास तो सक्षम असल्याचं त्याने दाखवून दिलं. घराणेशाही, गुन्हेगार आणि आय़ात केलेल्या उमेदवारांनी मतदाराराजाने घरचा रस्ता दाखवला.
या उमेदवारांना दाखवला घरचा रस्ता - मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांचा भाऊ विनोद शेलारांचा पराभव - शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी शेवाळेंना घरचा रस्ता - मनसेचे माजी नगरसेवक,आमदार मंगेश सांगळे पराभूत - मुंबईचं हार्ट समजल्या जाणाऱ्या दादरमध्ये मनसेच्या स्वप्ना देशपांडे पराभूत - काँग्रेसचे दिग्गज नगरसेवक राहिलेले प्रवीण छेडा पराभत - शिवसेनेचे लोकप्रिय नगरसेवक नाना आंबोलेंच्या पत्नी तेजस्वीनी आंबोले पराभूत - शिवसेना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव पराभूत - शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे पराभूत - काँग्रेसमधुन शिवसेनेत आलेले माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर पराभूत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv