15 डिसेंबर : दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्या शीतयुद्धात आज भडका उडाला. अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकलाय. सीबीआयने केजरीवाल यांचं कार्यालयही सील केलंय. सीबीआयच्या या कारवाईमुळे केजरीवाल संतापले असून मोदींनी ही भ्याडपणे कारवाई केली असून ते मनोरुग्ण आहे अशी विखारी टीका केली.
दिल्लीच्या तख्यावर आम आदमी पार्टी विराजमान झाल्यापासून भाजप आणि आपमध्ये शीतयुद्ध सुरूच आहे. आपच्या मंत्र्यांवर कारवाई असो अथवा इतर कोणत्याही प्रकरणात केंद्राकडून धडक कारवाई केली गेल्याचं घडत आलंय. आज सकाळी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर छापा टाकला. केजरीवाल यांचं कार्यालय सीलही करण्यात आलंय. प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली अशी माहिती सीबीआयने दिली. सीबीआयच्या छाप्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपला संताप ट्विटरवर व्यक्त केला. मोदी राजकीय पद्धतीने माझा सामना करू शकत नाहीत म्हणून त्यांनी हा भ्याडपणा केला आहे. मोदी हे भित्रे आणि मनोरुग्ण आहे अशी टीकाही केजरीवाल यांनी केली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++