08 जून : मुंबईतील वाहतूक कोंडीसाठी एक महत्वाचा पर्याय ठरणार्या कोस्टल रोडला अखेर परवानगी मिळाली आहे. या प्रस्तावित प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी) केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. यासंदर्भात येत्या 15 जूनपर्यंत अधिसूचनाही काढण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तसंच येत्या तीन वर्षात कोस्टल रोड पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या नव्या मार्गामुळे पश्चिम उपनगरात राहणार्या आणि दक्षिण मुंबईत कामावर जाणार्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुदैवाने वाहतूक कोंडी असलेला एस. व्ही. रोड किंवा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे न घेता, थेट नरिमन पॉईंट गाठता येईल. दरम्यान, राज्य सरकारच्या माध्यमातून उभा राहणार असल्यानं शिवसेना-भाजपात पुन्हा श्रेयाचं राजकारण सुरू झालं आहे. कोस्टल रोड प्रकल्प हा महापालिका करेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं असताना मुख्यमंत्री मात्र नेदरलँडच्या कंपनीसोबत करार करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी नेदरलँडच्या कंपनीकडून या प्रकल्पाचा आराखडा तयार करून घेतला आहे. 2017 साली होणार्या महापालिका निवडणुकांवर दोन्ही पक्षांचा डोळा असल्यामुळे हा प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरुन दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये पुन्हा एकदा जंुपली आहे. कोस्टल रोड प्रकल्प - दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी कोस्टल रोड - नरिमन पॉईंट ते कांदिवली - 35.6 किमीचा कोस्टल रोड - कोस्टल रोड प्रकल्पात 5 मुख्य टप्पे - कांदिवली ते वर्सोवा, वर्सोवा ते वांद्रे, वांद्रे ते वरळी, वरळी ते हाजी अली, हाजी अली ते नरिमन पॉईंट - या प्रकल्पातला वांद्रे ते वरळी सागरी पूल 2009 साली खुला - अपेक्षित खर्च 10 हजार कोटी रु. - प्रकल्पासाठी सीआरझेड कायद्यात बदल करण्याची गरज
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++