20 फेब्रुवारी : शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय समिती स्थापन करण्यात आली पण इथंही भाजपकडून समन्वयाचा अभाव दिसून आलाय. भाजपने समन्वय समितीत मित्रपक्षांना स्थानचं दिलं नाही. त्यामुळे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली असून आम्ही चारही पक्ष 21 तारखेला बैठक घेऊन यावर निर्णय घेऊ असं स्पष्ट केलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. याच निमित्त साधत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते’ असा टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. एवढंच नाहीतर सामनामधून चांगलेच तोंडसुख घेतले होते. त्यामुळे भाजपने टीका करायची तर पक्षातून बाहेर पडा असा इशाराच दिला. सेनेनंही आपल्या राज्यमंत्र्यांना कामाची संधीच दिली जात नाही असा आरोप करून भाजपला पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर या वादावर समन्वय समितीचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला. पण या वादात विधानसभेसाठी सोबतीला घेतलेल्या मित्रपक्षांना पुन्हा डावलण्यात आलं. रिपाइं,स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्यांचा समन्वय समितीत सहभागच करण्यात आला नाही. त्यामुळे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिल होतं. पण ते पाळलं नाही आणि समन्वय समितीतही स्थान दिलं नाही, या आमच्यावर होत असलेला अन्याय आहे अशी तीव्र नाराजी आठवलेंनी व्यक्त केली. तसंच या अन्यायाविरोधात आम्ही 4 मित्र पक्ष एकत्र येऊन 21 फेब्रुवारीला ह्यावर निर्णय घेणार आहोत असंही आठवले यांनी म्हटलंय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++