25 नोव्हेंबर : नवी मुंबईत खारघरमध्ये मारहाण करण्यात आलेल्या पूर्वा पाळणाघराची आज तोडफोड करण्यात आलीये. यातल्या संचालिका प्रियांका निकम आणि आया अफसाना शेख या दोघांवर खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई मारहाण प्रकरण खांदेश्वर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे खारघरमधल्या संतापलेल्या स्थानिकांनी खारघर ग्रामपंचायत सदस्यान मार्फ़त पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी च्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त सदस्यांमार्फत प्ले स्कूलच्या कार्यालयाची तोड़फोड़ करण्यात आली. या सदस्यांनी ही प्ले स्कूल बंद करण्याची मागणी केली असून यापुढे ही प्ले स्कूल चालू देणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv