JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पुण्यात चक्क पेनमधून भागवलं जातंय हुक्काबाजीचं व्यसन

पुण्यात चक्क पेनमधून भागवलं जातंय हुक्काबाजीचं व्यसन

वैभव सोनवणे, पुणे 09 जून : लहान शाळकरी मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता हा चिंतेचा विषय आहे. पण रोज नव्याने बदलणार्‍या व्यसनाच्या पद्धती आता खरच पालकांना चिंतेत टाकणार्‍या आहेत. हे व्यसन आहे हुक्का आणि तेही खिशाला लावायच्या पेन मधून. शाळेत लिहिण्यासाठी जे पेन वापरलं जातं तसंच एक पेन सध्या पुण्यातल्या शाळांमध्ये लोकप्रिय झालं आहे. पण हा कोणाता साधा-सुधा पेन नसून जीवघेणं आहे. कारण हा पेन लिहिण्यासाठी नाही, तर व्यसनासाठी वापरलं जातो. या पेनचा वापर चक्क हुक्का ओढण्यासाठी होतो आणि पुण्यातील शाळकरी मुलं त्याच्या आहारी गेली आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वैभव सोनवणे, पुणे 09 जून : लहान शाळकरी मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता हा चिंतेचा विषय आहे. पण रोज नव्याने बदलणार्‍या व्यसनाच्या पद्धती आता खरच पालकांना चिंतेत टाकणार्‍या आहेत. हे व्यसन आहे हुक्का आणि तेही खिशाला लावायच्या पेन मधून. Pune hukka21 शाळेत लिहिण्यासाठी जे पेन वापरलं जातं तसंच एक पेन सध्या पुण्यातल्या शाळांमध्ये लोकप्रिय झालं आहे. पण हा कोणाता साधा-सुधा पेन नसून जीवघेणं आहे. कारण हा पेन लिहिण्यासाठी नाही, तर व्यसनासाठी वापरलं जातो. या पेनचा वापर चक्क हुक्का ओढण्यासाठी होतो आणि पुण्यातील शाळकरी मुलं त्याच्या आहारी गेली आहेत. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थेच्या पाहणीत ही बाब उघड झाली आहे. हुक्का ओढण्यासाठी आणि चार्जिंग करता येणारं हे आहे इलेक्ट्रोनिक पेन. त्यात हुक्क्याचा फ्लेवर भरून शिलगावलं जातो. ओढल्यानंतर त्यातून धूर येतो. हे पेन हजार ते बाराशे रुपयांना ऑनलाईन मिळतं. याच्या धुरात लहान मुलांचं आयुष्य उद्धवस्त होतं आहे. शाळकरी मुलांमध्ये हा पेन प्रचंड लोकप्रिय झालं आहे. पण पुणे पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाला याचा काहीच थांगपत्ता नाही आहे. धुराच्या लोटात जाणार्‍या पिढीला सावरण्यासाठी पालक आणि शिक्षकांनीही करडी नजर ठेवायला हवी.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या