JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पंतप्रधानांच्या कार्यक्रमात एका ‘आम आदमी’चा गोंधळ

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात एका ‘आम आदमी’चा गोंधळ

29 जानेवारी : नवी दिल्लीत विज्ञान भवनात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणात एका आंदोलनकर्त्याने आज व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. एम फहीम बेग असं व्यक्तीचं नाव आहे. यूपीए सरकारच्या अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी होत नाही, सरकारच्या कोणत्याही योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचत नाही असं सांगत बेगने गोंधळ घातला. सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ विज्ञान भवनाच्या बाहेर नेण्यात आलं. विज्ञान भवनात वक्फ विकास मंडळाच्या लाँचच्या कार्यक्रमात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांचं भाषण संपल्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या भाषणासाठी उठले आणि तेव्हाच या व्यक्तीने गोंधळ घालायला सुरूवात केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

pm 3453 29 जानेवारी : नवी दिल्लीत विज्ञान भवनात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणात एका आंदोलनकर्त्याने आज व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. एम फहीम बेग असं व्यक्तीचं नाव आहे. यूपीए सरकारच्या अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी होत नाही, सरकारच्या कोणत्याही योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचत नाही असं सांगत बेगने गोंधळ घातला. सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ विज्ञान भवनाच्या बाहेर नेण्यात आलं.

विज्ञान भवनात वक्फ विकास मंडळाच्या लाँचच्या कार्यक्रमात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांचं भाषण संपल्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या भाषणासाठी उठले आणि तेव्हाच या व्यक्तीने गोंधळ घालायला सुरूवात केली.

सुरक्षारक्षकांनी तात्काळ बेगला बाहेर नेले. आपण या अगोदर 150 पत्र पंत्रप्रधानांना लिहले पण एकाही पत्राचे उत्तर आजपर्यंत मिळाले नाही, सरकारने कोणत्याही योजना केल्या तरी त्या आमच्यापर्यंत पोहचत नाही असं व्यक्तीचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या