14 ऑक्टोबर : नाशिकमध्ये अफवा पसरवणाऱ्या 7 व्हॉट्सऍप ग्रुप्सच्या ऍडमिनविरोधात पोलिसांनी कारवाई केलीये. अफवा पसरवून समाजात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली त्यांना पोलिसांनी अटक केलीये. त्यासोबतच फेसबुकवर आपत्तीजनक फोटो आणि व्हिडिओ टाकणाऱ्या काही जणांवरही पोलिसांनी कारवाईचं अस्त्र उगारलंय.
त्र्यंबकेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर हिंसाचार घडला होता. संतप्त जमावाने वाहनांचा जाळपोळ आणि तोडफोड केली होती. त्यामुळे नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला होता. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर सोशल मीडियावरुनअफवा पसरवण्याचं काम झालं होतं. त्यामुळेअजूनही इंटनेटवर बंद ठेवण्यात आलंय. आज सायबर सेल ऍक्टनुसार पोलिसांनी धडक कारवाई केलीये. 7 व्हॉटस्ऍप ग्रुप ऍडिमनना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अफवा पसरवून समाजात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्या दाखल करण्यात आलाय. तसंच फेसबुक अकाऊंटवरुनही अफवा पसरवणाऱ्या एका जणावर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय अशी माहिती विशेष पोलीस महानिराक्षक विनय चौबे आणि पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv