14 सप्टेंबर : नागपुरात विदर्भवादीयांनी राज ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून मनसे आणि विदर्भवादींमध्ये नवा वाद सुरू झालाय. विदर्भवादी नेते वामनराव चटप यांची पत्रकार परिषद काल मनसेनं मुंूबईत उधळून लावली होती. त्यावर प्रतिक्रिया म्हणून आज राज यांचा पुतळा नागपुरात जाळण्यात आला.
वेगळ्या विदर्भाबाबत मुंबईत घेतलेली पत्रकार परिषद मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल (मंगळवारी) उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचे पडसाद आज (बुधवारी) नागपुरात उमटले आहेत. नागपुरात विदर्भवादीयांनी राज ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. मुंबई मराठी पत्रकार संघात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे झेंडे घेऊन अखंड महाराष्ट्राची घोषणाबाजी करत पत्रकार परिषद बंद पाडली. मुंबईत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडू देणार नाही, अखंड महाराष्ट्र ही मनसेची भूमिका आहे असं यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयोजकांना सांगितलं. सुमारे 10 मिनिटे हा गोंधळ सुरू होता. त्यावर प्रतिक्रिया म्हणून आज राज यांचा पुतळा नागपुरात जाळण्यात आला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv