JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / दिल्लीत सत्ता कुणाची? : 4 तारखेला मतदान

दिल्लीत सत्ता कुणाची? : 4 तारखेला मतदान

02 डिसेंबर : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. दिल्लीत विधानसभेसाठी चार डिसेंबरला मतदान होणार आहे. आणि आठ तारखेला निकाल लागणार आहे. याठिकाणी काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टी विजय मिळण्याची अपेक्षा करतेय. पण त्यांचं हे दिवास्वप्न असल्याची टीका भाजपनं केलीय. दिल्लीत गेली अनेक वर्षं काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत होती. पण, यावेळी दिल्लीत तिरंगी लढत रंगतेय. आम आदमी पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय आणि अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनात आघाडीची भूमिका बजावणारे अरविंद केजरीवाल यांचा राजकीय नेते म्हणून आता उदय झालाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

delhi election_news34 02 डिसेंबर : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. दिल्लीत विधानसभेसाठी चार डिसेंबरला मतदान होणार आहे. आणि आठ तारखेला निकाल लागणार आहे. याठिकाणी काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टी विजय मिळण्याची अपेक्षा करतेय. पण त्यांचं हे दिवास्वप्न असल्याची टीका भाजपनं केलीय.

दिल्लीत गेली अनेक वर्षं काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत होती. पण, यावेळी दिल्लीत तिरंगी लढत रंगतेय. आम आदमी पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय आणि अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनात आघाडीची भूमिका बजावणारे अरविंद केजरीवाल यांचा राजकीय नेते म्हणून आता उदय झालाय. गेल्या वर्षभरात आम आदमी पक्षानं शहरी मध्यमवर्गीय, तरुण आणि काँग्रेसचा मतदार असलेल्या झोपडपट्‌ट्यांमध्येही दमदार शिरकाव केलाय.

पण, आपचे उमेदवार कुठलीही शहानिशा न करता देणगी स्वीकारत असल्याचं एक स्टिंग ऑपरेशन उघड झालं आणि विरोधकांनी आपवर जोरदार हल्लाबोल चढवला. गेली 15 वर्षं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या शीला दीक्षित यांना तर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पातळ्यांवर सरकारविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय. राहुल गांधी यांच्या सभांना कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी आपला प्रचार दिल्लीतल्या स्थानिक मुद्द्यांवर केंद्रीत केलाय.

संबंधित बातम्या

दिल्ली भाजपमध्ये वाद निर्माण झाला तो मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून.अखेर भाजपनं डॉ. हर्षवर्धन पाटील हा स्वच्छ प्रतिमा असलेला चेहरा निवडला. पण, प्रचारात भाजपनं विश्वास दाखवला तो त्यांचे स्टार कॅम्पेनर नरेंद्र मोदी यांच्यावर. शहरी मध्यमवर्गावर भाजपनं लक्ष केंद्रीत केलंय. एकूणच आम आदमी पक्षामुळे दिल्लीतली निवडणूक अधिक रंजक झालीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या