07 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. लोकसभेत दमदार यश मिळवल्यानंतर शिवसेनेनं विधानसभेसाठी आता कंबर कसली आहे. मनसेच्या ‘बहुचर्चित’ ब्लू प्रिंटच्या अगोदर बाजी मारत सेनेनं आज (गुरुवारी) ‘व्हिजन डॉक्युमेंट’ सादर केली आहे. ‘चला, उठा महाराष्ट्र घडवूया’, या संकल्पनेखाली व्हिजन डॉक्युमेंट बनवण्यात आलंय.
मुंबई पहिला मान देत योजनाचा आराखडा तयार करण्यात आलाय. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणार अशी घोषणा उद्धव यांनी केली. तसंच गेल्या वर्षभरापासून रखडलेलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारणार असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, ग्रामीण, मागासवर्गियांसाठी वाढीव तरतूद असं निवडणुकीचं जोरदार पॅकेज यात आखण्यात आलंय. आज संध्याकाळी मुंबईत शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिजन डॉक्युमेंट सादर केली.
विशेष म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे यांनी 12 जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकार्यांशी संवाद साधला. औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक जिल्ह्यातल्या पदाधिकार्यांशी उद्धव यांनी एकाच वेळी संवाद साधला. यासाठी अगोदरच शिवसेनेनं 12 जिल्ह्यात व्हिडिओ कॉन्फरन्स सेंटर स्थापन केलं आहे. आता या डॉक्युमेंटवर महायुतीतल्या इतर घटक पक्षांच्यांही सूचना मागवणार आहे आणि त्यानंतर सर्वांचा विचार घेऊन वचननामा तयार करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.
कसं आहे शिवसेनेचं व्हिजन डॉक्युमेंट ? मुंबईसाठी योजना
ग्रामीण महाराष्ट्रासाठी योजना
शिक्षण
आरोग्य
मागासवर्गियांसाठी वाढीव आर्थिक तरतूद
इतर
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++