JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / गुरुजी, व्यसन कराल तर नोकरीला मुकाल !

गुरुजी, व्यसन कराल तर नोकरीला मुकाल !

16 सप्टेंबर : शिक्षक म्हणजे समाजाचा आरसा…पण काही व्यसनाधीन शिक्षकांमुळे शिक्षकीपेशाला काळा डाग लागलाय. अशा व्यसनाधीन शिक्षकांना धडा शिकवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसलीये. जर शाळेत कुणी व्यसनाधीन शिक्षक सापडला तर त्याला नोकरीपासून हात धुवावे लागणार आहे. शाळेत तंबाखू, विडी, सिगारेट किंवा दारू पिऊन जाणार्‍या शिक्षकांचं आता काही खरं नाही. राज्यातील शाळातील व्यसनी शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. या संबधीच शासकीय परिपत्रक जारी करण्यात आलंय. यामध्ये ज्या ज्या शिक्षकांना तंबाखू, सिगारेट, खर्रा, दारु यांचं व्यसन असेल अशा शिक्षकांवर कारवाई करा असं या परिपत्रक सांगण्यात आल्ंाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

techer33 16 सप्टेंबर : शिक्षक म्हणजे समाजाचा आरसा…पण काही व्यसनाधीन शिक्षकांमुळे शिक्षकीपेशाला काळा डाग लागलाय. अशा व्यसनाधीन शिक्षकांना धडा शिकवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसलीये. जर शाळेत कुणी व्यसनाधीन शिक्षक सापडला तर त्याला नोकरीपासून हात धुवावे लागणार आहे.

शाळेत तंबाखू, विडी, सिगारेट किंवा दारू पिऊन जाणार्‍या शिक्षकांचं आता काही खरं नाही. राज्यातील शाळातील व्यसनी शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. या संबधीच शासकीय परिपत्रक जारी करण्यात आलंय. यामध्ये ज्या ज्या शिक्षकांना तंबाखू, सिगारेट, खर्रा, दारु यांचं व्यसन असेल अशा शिक्षकांवर कारवाई करा असं या परिपत्रक सांगण्यात आल्ंाय. व्यसनी शिक्षकांवर कठोर कारवाई करत त्यांची बढती, शिक्षक पुरस्कार तसंच शासनाच्या मिळणार्‍या सोयींपासून वंचित करावं, पालन न करणार्‍या शिक्षकांवर थेट निलंबनाची कारवाई करावी असे स्पष्ट आदेश यामध्ये देण्यात आलेत.

संबंधित बातम्या


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या