JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / गडकरींच्या रोड शोकडे सेना,आरपीआयने फिरवली पाठ

गडकरींच्या रोड शोकडे सेना,आरपीआयने फिरवली पाठ

18 मार्च : भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज (मंगळवारी) रोड शो केला. पण आरपीआय आणि शिवसेनेनं यात भाग घेतला नाही. महायुतीचा घटक पक्ष आरपीआयला विदर्भातल्या दहा लोकसभा मतदारसंघांपैकी एकही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे आरपीआयने महायुतीचा प्रचार करणार नसल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेेखर सावरबांधे यांनी काही शिवसैनिक नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी गेले नसल्याचं कबूल केलंय. पण निरोप मिळाला नाही, म्हणून शिवसैनिक जाऊ शकले नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sena gadkari 18 मार्च : भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज (मंगळवारी) रोड शो केला. पण आरपीआय आणि शिवसेनेनं यात भाग घेतला नाही.

महायुतीचा घटक पक्ष आरपीआयला विदर्भातल्या दहा लोकसभा मतदारसंघांपैकी एकही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे आरपीआयने महायुतीचा प्रचार करणार नसल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं.

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेेखर सावरबांधे यांनी काही शिवसैनिक नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी गेले नसल्याचं कबूल केलंय. पण निरोप मिळाला नाही, म्हणून शिवसैनिक जाऊ शकले नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तर बहिष्कार मागे घेतल्याचं आरपीआयनं स्पष्ट केलंय.

संबंधित बातम्या

त्यामुळे नितीन गडकरी यांच्या आजच्या रोड शोदरम्यान आरपीआय आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दिसले नाहीत. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वीच गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यामुळे शिवसेना त्यांच्या चांगलीच नाराज झाली होती. याबद्दल उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांच्यावर टीकाही केली होती. या नाराजीचे पडसाद आज गडकरींच्या रोड शोवरही दिसून आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या