19 जून : कोल्हापूर शहरात आज पुन्हा एक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालीय. हा मृतदेह वृद्ध महिलेचा आहे. शहरातल्या लक्ष्मीपुरी भागातल्या रिलायन्स मॉलजवळ हा मृतदेह आढळून आलाय. कोल्हापूर शहरात गेल्या 2 महिन्यांमध्ये शहरात 9 खून झाले आहे. त्यातले 7 खून हे डोक्यात दगड घालून करण्यात आलेत. रेल्वे स्टेशन भागात झालेले खून सीरियल किलिंगचा प्रकार नसल्याचा दावा पोलीस करत आहेत. मात्र ज्यांच्या खून झालाय त्या व्यक्तींकडे कोणतीही मौल्यवान वस्तू आढळलेली नाही त्यामुळे शहरातील हे खून नेमक्या कोणत्या कारणांसाठी होताहेत याच उत्तर मात्र कोणाकडेच नाहीय. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर पोलिसांसमोर तपासाचं आव्हान निर्माण झालंय.