JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, सेनेला आणखी मंत्रिपदं मिळणार?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, सेनेला आणखी मंत्रिपदं मिळणार?

29 मे : लोकसभेत घवघवीत यश मिळवल्यानंतर 26 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत 45 मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदींची टीम तयार झाली असली तरी मोदींच्या मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होणार आहे. येत्या 15 जूननंतर कॅबिनेटच्या विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशनाच्या सत्रापूर्वी ही विस्ताराची शक्यता आहे. यात राज्यमंत्र्यांसह 25 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात प्रामुख्याने राज्यमंत्री असतील. शिवाय संरक्षण मंत्रालयालाही नवा मंत्री मिळण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

787team_modi 29 मे : लोकसभेत घवघवीत यश मिळवल्यानंतर 26 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत 45 मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदींची टीम तयार झाली असली तरी मोदींच्या मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होणार आहे. येत्या 15 जूननंतर कॅबिनेटच्या विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशनाच्या सत्रापूर्वी ही विस्ताराची शक्यता आहे.

यात राज्यमंत्र्यांसह 25 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात प्रामुख्याने राज्यमंत्री असतील. शिवाय संरक्षण मंत्रालयालाही नवा मंत्री मिळण्याची शक्यता आहे. या विस्तारामध्ये मित्रपक्षांना आणखी जागा मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि राज्य मिळून 45 मंत्री आहेत. यामध्ये एनडीएच्या महत्त्वाच्या घटकांना चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कमी दर्जाच मंत्रिपद मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेसाठी पुन्हा एक नवी संधी चालून आली आहे. अवजड खाते स्वीकारत असताना अनंत गीतेंनी ही याबाबत संकेत दिले होते त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तार सेनेच्या पदरात आणखी मंत्रिपद मिळणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, आज दुसर्‍या दिवशी मोदींनी आपला 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला.

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदींचा  अजेंडा

4 जून ते 12 जून संसदेचं अधिवेशन संसदेचं अधिवेशन 4 जून ते 12 जून या काळात घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. 4 आणि 5 जूनला नवीन खासदारांचा शपथविधी होईल. 6 जूनला लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईल. नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत कमलनाथ हंगामी अध्यक्ष काम पाहतील. 9 जूनला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील तर 10 आणि 11 जूनला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या