07 फेब्रुवारी : कोल्हापूरच्या टोलचा मुद्दा पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकास प्रकल्पाच्या फेरमूल्यांकनाचे आदेश दिले होते. फेरमूल्यांकनानंतर प्रकल्पाची रक्कम निश्चित केली जाईल असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे. पण आयआरबीचे पैसे कोणी भरायचे हाच कळीचा मुद्दा असणार आहे.
लोकप्रतिनिधींनी राजीनामे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. आयआरबीनं पैसे खर्च केलेत, त्यांना ते या न त्या मार्गाने परत करावेच लागतील, अशी स्पष्ट भूमिका कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी काही वेळापूर्वी आयबीएन लोकमतशी बोलताना मांडली. दुसरीकडे फेरमूल्यांकन होईपर्यंत टोलला स्थगिती द्यावी अशी मागणी टोलविरोधी कृती समितीने केली आहे.