26 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश युवती अध्यक्षपदी निवड करण्यात आलीये.
माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा राजकीय वारसा आता स्मिता चालवणार आहेत. अगदी लहानपणापासून स्मिता यांनी आर आर पाटील यांचं राजकारण जवळून पाहिलं होतं. आर आर पाटील यांच्यासोबत अनेक दौरे त्यांनी केले होते. आर आर पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी तासगावचं प्रतिनिधीत्व केलं. आता पुढची निवडणूक स्मिता लढवतील अशी चर्चा आता सुरू झालीये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv