JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / आपच्या रॅलीत 'त्या' शेतकर्‍याचा मृत्यू अपघाताने, आत्महत्या नाही !

आपच्या रॅलीत 'त्या' शेतकर्‍याचा मृत्यू अपघाताने, आत्महत्या नाही !

28 एप्रिल : आम आदमी पक्षाच्या रॅलीत गजेंद्र सिंह या शेतकर्‍याचा मृत्यू ही आत्महत्या नसून तो एक अपघाती मृत्यू आहे, असा धक्कादायक अहवाल दिल्लीच्या क्राईम ब्रँच शाखेनं दिलाय. यासंदर्भात चॅनेल्सचं फुटेज तपासल्यानंतरच अंतिम अहवाल दिला जाईल असंही दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय. पण पोलिसांच्या या प्राथमिक अहवालाने आम आदमी पार्टी वाल्यांची चांगलीच गोची झालीये. कारण यावरून गजेंद्र सिंहला आत्महत्या करायचीच नव्हती तरीही त्याला तिथल्या जमावाकडून झाडावर चढण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं आणि याच स्टंटबाजीत गजेंद्र सिंहचा झाडाच्या फांदीवरून पाय घसरून मृत्य झाला असा त्याचा साधा सरळ अर्थ निघतोय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

kejriwal on gajendra singh_ 28 एप्रिल : आम आदमी पक्षाच्या रॅलीत गजेंद्र सिंह या शेतकर्‍याचा मृत्यू ही आत्महत्या नसून तो एक अपघाती मृत्यू आहे, असा धक्कादायक अहवाल दिल्लीच्या क्राईम ब्रँच शाखेनं दिलाय. यासंदर्भात चॅनेल्सचं फुटेज तपासल्यानंतरच अंतिम अहवाल दिला जाईल असंही दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय. पण पोलिसांच्या या प्राथमिक अहवालाने आम आदमी पार्टी वाल्यांची चांगलीच गोची झालीये. कारण यावरून गजेंद्र सिंहला आत्महत्या करायचीच नव्हती तरीही त्याला तिथल्या जमावाकडून झाडावर चढण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं आणि याच स्टंटबाजीत गजेंद्र सिंहचा झाडाच्या फांदीवरून पाय घसरून मृत्य झाला असा त्याचा साधा सरळ अर्थ निघतोय. म्हणूनच दिल्ली पोलिसांच्या या अपघाती मृत्यूच्या अहवालावर आप नेमकी काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे. कारण, गजेंद्र सिंहच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलीस भाजपच्या राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आपने यापूर्वीच केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या