JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / असभ्य वक्तव्यावर फडणवीस ठाम

असभ्य वक्तव्यावर फडणवीस ठाम

06 जानेवारी : ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यावर केलेल्या असभ्य टीकेवर दिलगिरी व्यक्त करायला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिलाय. आपल्या टीकेवर ठाम राहत फडणवीस यांनी माझं वक्तव्य नीट ऐकलं गेलं नाही. अशा संपादकांकडे दुर्लक्षच केले पाहिजे. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा पत्रकार ,संपादकांना आहे तोच आम्हालाही आहे. त्यामुळे केतकर जे काही बोलले त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरजच नसून दुर्लक्ष करावे या आपल्या टीकेवर फडणवीस ठाम राहिले. लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपची पत्रकार परिषद झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

devendra fadnvis44 06 जानेवारी : ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यावर केलेल्या असभ्य टीकेवर दिलगिरी व्यक्त करायला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिलाय. आपल्या टीकेवर ठाम राहत फडणवीस यांनी माझं वक्तव्य नीट ऐकलं गेलं नाही. अशा संपादकांकडे दुर्लक्षच केले पाहिजे. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा पत्रकार ,संपादकांना आहे तोच आम्हालाही आहे. त्यामुळे केतकर जे काही बोलले त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरजच नसून दुर्लक्ष करावे या आपल्या टीकेवर फडणवीस ठाम राहिले. लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला, पण त्यांनी दिलगिरी वक्त करण्यास नकार दिला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून ही फॅसिस्ट वृत्ती आहे आणि दाभोलकरांचा खून करणारी फॅसिस्ट वृत्ती ही भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या उदयानंतर झाली आहे अशी घणाघाती टीका ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी सासवड येथे पार पडलेल्या 87 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केली होती. मात्र केतकरांची टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच झोंबली.

त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी भान न बाळगता टीकेला सुरुवात केली. नरेंद्र मोदींची वाढती लोकप्रियता पाहता ती सहन झाली नाही म्हणून केतकर यांच्या पोटात दुखू लागलंय. त्यामुळे केतकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी असी टीका केली ती निषेधार्ह आहे अशी टीका भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे नेते विनोद तावडे यांनी केली. त्यांच्या पाठोपाठ अभ्यासपूर्ण बोलणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा तर तोलच ढळला.

लोकशाहीमध्ये जो जनतेच्या मनामध्ये असतो तोच खरा नेता असतो आणि जनतेच्या मनामध्ये नरेंद्र मोदी आहे. ज्या वेळी एखादा प्राणी हिंसक होतो. त्यावेळी आपण त्याचा वेडा म्हणून नाश करतो. जर एखादा संपादक वेडा झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं असभ्य उद्गार फडणवीस यांनी काढले. फडणवीस यांनी पत्रकारांवर होणार्‍या टीकेचा नीचांक गाठला. एवढे होऊन सुद्धा फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला. उलट अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचं कारण देत दिलगिरी व्यक्त करण्यास टाळले आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या