JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अति ताणामुळे महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू

अति ताणामुळे महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू

02 डिसेंबर : मुंबईतल्या मुलुंड रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असताना आरपीएफमध्ये कार्यरत एका महिला कॉन्स्टेबलचा अचानक मृत्यू झालाय. श्रुती चोपडेकर असं या कॉन्स्टेबलचं नाव आहे. ड्युटीवर असताना त्या चक्कर येऊन खाली कोसळल्या आणि त्यानंतर त्यांच्या तोंडाला फेस आला. तातडीने त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आपल्या पत्नीचा मृत्यू कामाच्या अति ताणामुळे झाल्याचा आरोप श्रुतीचे पती बाबू चोपडेकर यांनी केलाय. श्रुती चोपडेकरांनी गेल्या 14 वर्षांत फक्त दोन वेळा मातृत्वासाठी रजा घेतली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

woman ded 02 डिसेंबर : मुंबईतल्या मुलुंड रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असताना आरपीएफमध्ये कार्यरत एका महिला कॉन्स्टेबलचा अचानक मृत्यू झालाय. श्रुती चोपडेकर असं या कॉन्स्टेबलचं नाव आहे. ड्युटीवर असताना त्या चक्कर येऊन खाली कोसळल्या आणि त्यानंतर त्यांच्या तोंडाला फेस आला. तातडीने त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आपल्या पत्नीचा मृत्यू कामाच्या अति ताणामुळे झाल्याचा आरोप श्रुतीचे पती बाबू चोपडेकर यांनी केलाय.

श्रुती चोपडेकरांनी गेल्या 14 वर्षांत फक्त दोन वेळा मातृत्वासाठी रजा घेतली होती. त्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारची रजा घेतलेली नाही. त्या गेली दोन वर्ष सलग 12 तास ड्युटी करत होत्या. याबाबत पोलिसांना विचारलं असता त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलायला नकार दिलाय.

हा मृत्यू ताणामुळच झाला का याचा खुलासा आता पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर होणार आहे. दरम्यान, श्रुतीचे पती बदली ड्रायव्हरचं काम करतात. त्याना दोन लहान मुलं आहेत. 8 वर्षाची मुलगी आणि 10 वर्षाचा मुलगा आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी श्रुतीवरच होती. श्रुतीच्या मृत्युमुळे आपल्या कुटुंबाचा आधार हरपलाय. यामुळे अनुकंपा तत्त्वावर आपल्याला नोकरीत सामावून घ्यावं अशी मागणी बाबू चोपडेंनी केलीय.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या