JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सुषमा स्वराज आज 'यूएन'मध्ये नवाज शरीफ यांना देणार प्रत्युत्तर

सुषमा स्वराज आज 'यूएन'मध्ये नवाज शरीफ यांना देणार प्रत्युत्तर

26 सप्टेंबर : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज (सोमवारी) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत जगाला संबोधित करणार आहेत. यामध्ये ते पाकिस्तानला त्या काय उत्तर देणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले आहेत. दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने भारतावरच खोटे आरोप केले आहेत. शरीफ यांच्या यूएनच्या भाषणानंतर सर्वच भारतीयांमध्ये असंतोषाची लाट आहे. नवाज शरीफ यांच्या काश्मीरबाबतच्या मुक्ताफळांना त्या उत्तर देतील, अशी अपेक्षा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
Sushma_B_25122015

26 सप्टेंबर :  भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज (सोमवारी) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत जगाला संबोधित करणार आहेत. यामध्ये ते  पाकिस्तानला त्या काय उत्तर देणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले आहेत. दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने भारतावरच खोटे आरोप केले आहेत. शरीफ यांच्या यूएनच्या भाषणानंतर सर्वच भारतीयांमध्ये असंतोषाची लाट आहे. नवाज शरीफ यांच्या काश्मीरबाबतच्या मुक्ताफळांना त्या उत्तर देतील, अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

  उरी हल्ल्याबाबत पाकचं पितळ उघडं पाडणे, पाकिस्तानला एकाकी पाडण्याचं जगाला आवाहन करणे, आणि भारताची सहनशक्ती संपलीय हे ठासून सांगणे, हे काही मुद्दे सुषमांच्या भाषणात अपेक्षित आहेत.  विशेष म्हणजे सुषमा स्वराज पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर कसा उघडा पाडतील, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ नंतर त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या