03 फेब्रुवारी : जागा वाटपात काय व्हायचं ते होऊया, आपली उमेदवारी निश्चितच…हा विश्वास आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री सुशिलकुमार शिंदेंचा..म्हणूनच शिंदेंनी त्यांच्या प्रचाराला सोलापुरातून सुरुवातही केली आहे. देशाचं गृहमंत्रालय जाऊ द्या, आपल्या मतदारसंघातलं गृह तरी टिकवून ठेऊया ही धास्तीच त्यांनी घेतलेली दिसते. कडाडणार्या हलग्या, धुरळा उडवणार्या गाड्या, पक्षाचे झेंडे अशा झंझावातात सोलापूरच्या तालुक्या तालुक्यात शिंदे कृतज्ञता मेळावे घेत आहेत. आता हे कृतज्ञता मेळावे आहेत की माफ करा मेळावे. हे सोलापूरकरांनीच ठरवावं.