JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात टीम इंडियाला यश

सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात टीम इंडियाला यश

10 जानेवारी : अजिंक्य रहाणेने टिच्चून केलेल्या 38 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात टीम इंडियाला यश मिळालं आहे. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानची बॉर्डर गावसकर टेस्ट सीरिज अखेर ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाच्या 349 धावांचा पाठलाग करताना मुरली विजय (80) आणि विराट कोहली (46) यांनी चांगली खेळी करत भारताला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या, पण इतर फलंदाजांनी टिकाव न धरल्याने भारत ही कसोटी गमवायच्या बेतात होता. मात्र अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमारच्या संयमी बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियानं सिडनी टेस्ट अखेर ड्रॉ केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
Sydny Match

10  जानेवारी :  अजिंक्य रहाणेने टिच्चून केलेल्या 38 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात टीम इंडियाला यश मिळालं आहे. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानची बॉर्डर गावसकर टेस्ट सीरिज अखेर ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 349 धावांचा पाठलाग करताना मुरली विजय (80) आणि विराट कोहली (46) यांनी चांगली खेळी करत भारताला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या, पण इतर फलंदाजांनी टिकाव न धरल्याने भारत ही कसोटी गमवायच्या बेतात होता. मात्र अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमारच्या संयमी बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियानं सिडनी टेस्ट अखेर ड्रॉ केली. भारत 2-0 अशी मालिका हरला असला तरी शेवटच्या दोन कसोटी अनिर्णित राखल्यामुळे भारताची काही प्रमाणात लाज राखली गेली आहे. पण टीम इंडियाला पुन्हा एकदा परदेश दौर्‍यावर पराभवाचा सामना करावा लागला आहे.

संबंधित बातम्या

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या